एक्स्प्लोर

Uttar Pradesh Ghaziabad News: इमारतीच्या 9 व्या मजल्यावरुन उडी मारुन 3 बहिणींनी जीवन संपवलं; खोलीत नको नको ते मिळालं, नेमकं काय घडलं?

Uttar Pradesh Ghaziabad News: गाझियाबादच्या भारत सिटी सोसायटीमध्ये राहणाऱ्या तीन अल्पवयीन बहिणींच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे.

Uttar Pradesh Ghaziabad News: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन अल्पवयीन बहिणींनी इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. निशिका (16), प्राची (14) आणि पाखी (12) यांनी सामूहिक आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून सदर प्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. (Uttar Pradesh Ghaziabad News)

गाझियाबादच्या तिला मोड पोलीस स्टेशन परिसरातून ही खळबळजनक घटना समोर आली आहे. भारत सिटी सोसायटीमध्ये राहणाऱ्या तीन अल्पवयीन बहिणींच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. हे प्रकरण गेमिंग अॅप व्यसनाचे असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला आहे.

नेमकं काय घडलं? (Uttar Pradesh Ghaziabad News)

गाझियाबादमधील तिला मोड येथील भारत सिटी सोसायटीमध्ये रात्री 2 वाजताच्या सुमारास, तीन जण पडल्याचा आवाज ऐकून लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही बहिणींचे मृतदेह पाहून सर्वांना धक्का बसला. पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली. घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचली. तिन्ही बहिणींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यांचा मृत्यू आधीच झाला होता. ऑनलाइन गेमिंग अॅप्सचे व्यसन असलेल्या तिन्ही बहिणींबद्दल माहिती समोर येत आहे. त्या सतत गेम खेळत होत्या.

गेममध्ये टास्क मिळाल्याचा दावा- (Uttar Pradesh Ghaziabad News)

ऑनलाइन गेममध्ये एक टास्क देण्यात आला होता. कुटुंबातील सदस्यांच्या मते, तिन्ही मुली सुमारे एक वर्षापासून ऑनलाइन गेम खेळत होत्या. गेमच्या शेवटच्या टप्प्यात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शेवटच्या वेळी भेटणे आणि सर्वांचे फोटो काढणे समाविष्ट होते. त्यानंतर, सर्वांना एका खोलीत बंद करायचे होते. त्यानंतर, कोरियन ऑनलाइन गेममध्ये आत्महत्या करण्याचा टास्क होता, असा दावाही करण्यात येत आहे. 

मुलींच्या खोलीत नेमकं काय मिळालं? (Uttar Pradesh Ghaziabad News)

घटनेची माहिती मिळताच एसीपीच्या नेतृत्वाखालील एक पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. एसीपी स्वतः घटनेचा तपास करत आहेत. आर्थिक कारणांमुळे कोविड-19 साथीच्या आजारापासून तिन्ही मुली शाळेत जात नव्हत्या. कोरियन ऑनलाइन मोबाइल गेमच्या नमुन्यातील छायाचित्रे त्यांच्या खोलीत विखुरलेली आढळली. गेमचा अंतिम ध्येय पूर्ण केल्यानंतर हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे दिसून येते. या प्रकरणात एक सुसाईड नोटही जप्त करण्यात आली आहे.

ही बातमीही वाचा:

धक्कादायक! लोणावळ्यात 19 वर्षीय तरुणीचा अपघात नसून आत्महत्याच, 390 फूट खोल दरीत घेतली उडी 

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Nashik Crime News: चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावर गेला, 3 तास कड्यावर उभा राहिला; उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू; जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Epstein Files Movie Teaser: अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Embed widget