पुणे : भर रस्त्यावर लघुशंका करत अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाच्या माजाचे विमान आता जमिनीवर उतरलं असून त्याने आणखी एकदा माफी मागितली आहे. आपल्या कृत्याच्या खेद वाटतोय, आपण चुकलो असल्याचं त्याने म्हटलं आहे. तसेच सगळ्या पुणेकरांची, पुणे पोलिसांची आणि शिंदे साहेबांची मी माफी मागतो असंही तो म्हणाला. गौरव आहुजा आता सातारा जिल्ह्यात असून तो कराड पोलिसांना शरण जात आहे. त्या आधी त्याने एबीपी माझाशी बोलताना माफी मागितली आहे. 


पुण्याच्या गजबजलेल्या शास्त्रीनगर चौकात भर सकाळी, गौरव आहुजा नावाच्या तरुणाने अश्लील प्रकार केला. सिग्नलवर गाडी रस्त्याच्या मधोमध उभी करुन, त्याने भरचौकात लघुशंका केल्याची विकृत घटना कॅमेऱ्यात कैद झाली. एमएच 12 आरएफ 8419 या क्रमांकाच्या बीएमडब्ल्यू गाडीतून आलेल्या गौरवने, श्रीमंतीचा माज दाखवत सर्व कायदे धाब्यावर बसवले.


विशेष म्हणजे जाब विचारायला गेलेल्यांसमोरही विकृत कृत्य करत तो फरार झाला होता. आता कराड पोलिसांना तो शरण गेला आहे. त्याआधी त्याचा मित्र भाग्येश निबजीयालासुद्धा अटक करण्यात आली. आता गौरवलाही ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. या दोघानींही दारू प्यायली होती का हे तपासले जाणार आहे. विशेष म्हणजे गौरव आहुजाने आधीही एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये त्याने सर्वांची माफी मागत आपल्या कुटुंबाला त्रास देऊ नये असं आवाहान केलं होतं.  


गौरव आहुजाची गुन्हेगारी पार्श्वभूमी


पुण्यात भर चौकात लघुशंका करणाऱ्या गौरव अहुजाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. गौरव अहुजावर जुगार आणि अपहरणाचा देखील गुन्हा दाखल आहे. पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यात 2021 साली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावेळी गौरव अवघ्या 20 वर्षांचा होता. क्रिकेटवर बेटींग घेणाऱ्या टोळीचा देखील गौरव सदस्य आहे. 


पुण्यातील कुख्यात गुंड सचिन पोटेच्या नेतृत्वात ही टोळी काम करते. या बेटिंगच्या व्यसनात कॉलेजचे अनेकतरुण कर्जबाजारीही झाले आहेत. कर्ज फेडण्यासाठी या टोळीने त्या कॉलेज तरुणांना स्वतःच्या घरात चोरी करायला भाग पाडल्याचीही माहिती आहे. ज्यांनी पैसे दिले नाहीत त्या तरुणांचं अपहरण देखील करण्यात येत होतं. एका तरुणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सचिन पोटे, गौरव आहूजा, अजय शिंदे, सुनील मखीजाला अटक केली होती.



ही बातमी वाचा: