Mumbai Crime : मुंबईतील कांदिवलीमध्ये चार जणांचे मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. यापैकी तीन जण एकाच कुटुंबातील आहेत. पोलिसांन दिलेल्या माहितीनुसार, चार मृतांपैकी एक ड्रायव्हर असल्याचं समोर येत आहे. तर इतर तीन मृतांमध्ये एक महिला आणि तिच्या दोन मुलींचा समावेश आहे. प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, हे हत्याकांड प्रेम प्रकरणातून झाल्याचं उघड होत आहे. ड्रायव्हरने मालकीनं आणि तिच्या दोन मुलींची हत्या करत स्वत: आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याची माहिती
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ड्रायव्हरचे मृत तीन जणींपैकी एकीसोबत प्रेम संबंध होते. यातून या प्रकरणाला हिंसक वळण लागल्याचं समोर येत आहे. ड्रायव्हरच्या प्रेमसंबंधांची माहिती कुटुंबातील इतर जणांना झाली. यावरून त्यांच्या सतत वाद होत होते. या वादाला कंटाळून ड्रायव्हरने महिलेची हत्या केली. त्यानंतर त्याने दोन्ही तरुणींची हत्या करत स्वत:चं जीवन संपवलं. पोलिसांनी चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
घटनास्थळी सुसाईट नोट सापडली - सूत्र
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेह शताब्दी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोटही सापडल्या आहेत. घटनास्थळावरून पोलिसांनी एक धारदार शस्त्र जप्त केलं आहे. मृतांची नावं किरण दळवी, मुस्कान दळवी, भूमी दळवी आणि शिवदयाल सेन अशी आहेत.
ड्रायव्हर शिवदयाल सेनच्या खिशातूल पोलिसांनी सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये लिहीलं आहे की, त्याचं भूमीवर प्रेम होतं. यामुळे त्याने तिघींची हत्या केली आणि आत्महत्या करण्याचं ठरवलं. ड्रायव्हर शिवदयाल सेननं तिघींची हत्या करत स्वत: गळफास घेत आत्महत्या केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या