Mahesh Babu, Bill Gates : साऊथ सुपरस्टार, अभिनेता-निर्माता महेश बाबू (Mahehs Babu) आणि त्याची पत्नी-अभिनेत्री नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar) सध्या न्यूयॉर्क शहरात सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. अभिनेता महेश बाबू आपल्या संपूर्ण कुटुंबासह सुट्टीचा आनंद घेत आहेत. दरम्यान, अभिनेता या धमाल ट्रीपचे फोटो तो चाहत्यांसोबत शेअर करत आहे. नुकताच त्याने एक असा खास फोटो शेअर केला आहे, जो पाहून त्याचे चाहतेही थक्क झाले आहेत. न्यूयॉर्कच्या व्हेकेशनदरम्यान अभिनेता महेश बाबू आणि नम्रता यांनी अमेरिकन व्यावसायिक-मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान काढलेला एक फोटो महेश बाबू याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करत महेश बाबूने बिल गेट्स यांचे वर्णन ‘प्रेरणा’ म्हणून केले आहे.


सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना महेश बाबूने लिहिले की, ‘@thisisbillgates यांना भेटून खूप आनंद झाला! या जगातील महान द्रष्ट्यांपैकी एक...आणि तरीही सर्वात नम्र! खरोखरच एक प्रेरणा!!’ महेश बाबूच्या सर्व चाहत्यांनी या फोटोवर प्रतिक्रिया व्यक्त करत आनंद व्यक्त केला.


पाहा फोटो :



‘परफेक्ट फॅमिली मॅन’


महेश बाबू परफेक्ट ‘फॅमिली मॅन’ आहेत. महेश बाबू कामातून ब्रेक घेऊन सध्या आपल्या कुटुंबासोबत सुट्टीसाठी अमेरिकेत आला आहे. नुकतेच त्याने पत्नी नम्रता शिरोडकरसोबतचे व्हेकेशन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याने एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये तो सतत 'व्हॅकेशन मूड' हा हॅशटॅग वापरत आहे. महेश बाबूनेही मुलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यामुळेच अभिनेत्याला ‘परफेक्ट फॅमिली मॅन’ असेही म्हटले जाते.


महेश बाबूची पत्नी नम्रता शिरोडकर देखील बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पण, सध्या ती चित्रपटांपासून दूर आहे आणि आपल्या कुटुंबाला संपूर्ण वेळ देत आहे. दोघांची पहिली भेट 2000साली ‘वामसी’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर दोघे प्रेमात पडले. 2005 मध्ये दोघांनी लग्न केले. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.


हेही वाचा :


Sarkaru Vaari Paata : सबस्क्रिप्शन असतानाही Amazonवर नाही पाहता येणार महेश बाबूचा ‘सरकारु वारी पाटा’, मोजावे लागणार पैसे!


Sarkaru Vaari Paata : बॉक्स ऑफिसवर महेश बाबूचाच स्वॅग; 'सरकारू वारी पाटा' 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील