Belgaum Crime : शहरात वाढत असलेल्या गुंडगिरीला चाप लावण्यासाठी पहाटे पाच वाजता शहरातील गुंडांच्या घरावर पोलिसांनी धाडी टाकून काही गुंडांच्या घरातून घातक शस्त्रे जप्त केली.कायदा सुव्यवस्था विभागाचे पोलिस उपायुक्त रवींद्र गडादी यांच्या नेतृत्वाखाली दीडशे हून अधिक अधिकारी आणि पोलिसांनी शहरातील विविध भागात ही कारवाई केली.


जनतेला धमकावून खंडणी वसूल करणे,रिअल इस्टेट व्यवसायात धमकावून जागांचे व्यवहार करणे,कागदपत्रात फेरबदल करणे असे उद्योग गुंडांचे अलीकडे वाढले होते.काही गुंडांना तर राजकीय वरदहस्त लाभलेला होता.त्यामुळे गुंडगिरी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी भल्या पहाटे कारवाई करून गुंडगिरी मोडून काढण्याचा निश्चय केला आहे.


धाडीच्या वेळी तीन गुंडांच्या घरात घातक शस्त्रे सापडली . तलवार,चाकू ,जांबिया आणि अन्य शस्त्रे जप्त करण्यात आली .रुक्मिणी नगर येथील श्रीधर सत्यप्पा तलवार (२९),महाद्वार रोड येथील विनय शंकर प्रधान (४५) आणि खंजर गल्लीतील अल्ताफ सुभेदार (३६) या गुंडांच्या घरात शस्त्रे सापडली.


इतर महत्त्वाच्या बातम्या