एक्स्प्लोर

खोड्या करतो म्हणून जन्मदात्या बापानेच मुलाला संपवलं, कोल्ड्रिंक्समधून विषारी पावडर पाजलं

रागाच्या भरामध्ये मुलाला थम्सअपमध्ये सोडियम नायट्रेट्ची पावडर पाजून त्याला मारले." अशी कबुली आरोपी विजय बट्टू याने दिली.

सोलापूर जन्मदात्या बापानेच आपल्या 14 वर्षीय मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना सोलापुरात (Solapur Crime News)  उघडकीस आली आहे. विजय सिद्राम बट्टू असे मुलाची हत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. 13 जानेवारी रोजी विशाल विजय बट्टू हा सकाळपासून घरी आला नसल्याची तक्रार आई, वडील आणि नातेवाईकांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दिली होती. त्याच दिवशी रात्री 11 च्या सुमारास सोलापुरातल्या तुळजापूर नाका (Tuljapur Naka)  परिसरात एक मुलगा बेशुद्ध अवस्थेत असल्याचे पोलिसांना आढळून आले.

पोलिसांनी त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचारपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सकाळी विशाल बट्टू बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी लगेचच नातेवाईकांना बोलावून ओळख पटवली असता मृतदेह विशालचेच असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांना या प्रकरणी विशालचा घातपात झाल्याचा संशय होता.

"माझ्याकडून खूप मोठी चूक झाली", वडिलांनी दिली कबुली

त्यामुळे पोलिसांनी आधी आकस्मित मृत्यूची नोंद करत या प्रकरणाचा तपास सुरूच ठेवला होता. पोलिसांनी अनेकांची चौकशी केल्यानंतर संशयाची सुई ही वडिलांकडे जात होती. त्यातच आरोपी वडील विजय बट्टू याने पत्नी कीर्ती बट्टूकडे आपल्या हातून मोठी चूक झाल्याचे म्हटले. ही बाब लक्षात येताच कीर्ती यांनी पोलिसांना माहिती दिली. सोलापुरातल्या जोडभावी पेठ पोलिसांनी या तात्काळ विजय बट्टू यांना ताब्यात घेतं त्यांची चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिल्यानंतर आरोपी विजय बट्टू याने आपला कबुली जबाब दिला. "माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. विशालच्या सततच्या शाळेतील खोडकरपणाला, मोबाइलवर नको त्या गोष्टी पाहिल्यानं रागाच्या भरामध्ये मुलाला थम्सअपमध्ये सोडियम नायट्रेट्ची पावडर पाजून त्याला मारले." अशी कबुली आरोपी विजय बट्टू याने दिली.

15 दिवसांनी आरोपीने स्वतःहून दिली कबुली

घटना घडल्याच्या जवळपास 15 दिवसांनी आरोपीने स्वतःहून कबुली दिल्यानं आरोपीची पत्नी कीर्ती विजय बट्टू यांनीच पोलिसात फिर्याद दिली असून आरोपी विजय बट्टू याने आपल्या मुलाची हत्या केल्याची तक्रार पोलिसात दिली. त्यांच्या या फिर्यादीवरून विजय बट्टूवर भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी बट्टूला न्यायालसमोर हजर केलं असता न्यायालयाने 31 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केलीय. अशी माहिती जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी दिली.

हे ही वाचा:

 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani Crime: मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात
मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात
Nashik Ashram School : मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Embed widget