एक्स्प्लोर

आठवडी बाजारात बनावट नोटा देऊन शेतकऱ्यांची फसवणूक; पोलीस सतर्क, दोनजण ताब्यात

बनावट नोटा देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या प्रकारात सोलापूरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मोडनिंब येथील अशाच एका प्रकरणात पोलिसांनी आरोपीकडून 67 हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

सोलापूर: दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि बर्ड फ्ल्यूमुळे शेतकरी आधीच अडचणीत असताना आता बनावट नोटा देऊन त्यांच्या फसवणुकीचे प्रकार घडताना दिसत आहेत. मोडनिंब येथे बनावट नोटा देऊन शेतकऱ्याची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मोहोळ येथील बकऱ्यांच्या आठवडा बाजारात शेतकऱ्यांना नकली नोटा देऊन केलेली फसवणूक ताजी असतानाच सदरची घटना शनिवारी मोडनिंब येथेही घडली आहे. मोडनिंब येथील आठवडी बाजारात बनावट नोटा देऊन शेळ्या खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय. या प्रकरणी मोडनिंब पोलिसांनी सिद्धेश्वर कैचे या आरोपीला त्याच्या साथीदारासह ताब्यात घेतलं आहे.

लॉकडाऊनमध्ये रोजगार गेल्याने त्रिकुटाकडून 2 हजारांच्या बनावट नोटांची छपाई, तिघेही गजाआड

या प्रकरणी पोलिसांनी आरोपीकडून 67 हजार रुपयांच्या बनावट नोटाही जप्त केल्या आहेत. यामध्ये दोन हजार रुपयाच्या आणि पाचशे रुपयाच्या बनावट नोटा आहेत. आरोपीकडे या नोटा कोठून आल्या याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

माढा तालुक्यातील मोडनिंब येथे शेळ्या-मेंढ्यांचा मोठा बाजार भरतो. या ठिकाणी शेळ्या-मेंढ्या खरेदी-विक्रीची लाखो रुपयांची उलाढाल होते. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, पंढरपुर ,बार्शी, करमाळा या तालुक्यातील शेतकरी आपल्या शेळ्यामेंढ्या मोडनिंब च्या बाजारात विक्रीसाठी घेऊन येतात. सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, मिरज ,सांगली, कर्नाटक या भागातील व्यापारी मोडनिंब येथे खरेदीसाठी येतात.

धुळ्यात बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, 200 रुपयांच्या बनावट नोटा छपाई कारखान्यावर छापा

शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील शेतकरी कुंडलिक लेंगरे हे शेतकरी आपल्या दोन मेंढ्या व सहा बकरी घेऊन मोडनिंब बाजारात विक्रीसाठी बसले होते. त्यावेळी सिद्धेश्वर कैचे या तरुणाने 40 हजार रुपयाला लेंगरे यांच्याकडील आठ बकऱ्यांचा व्यवहार ठरवला. ही रक्कम देताना त्याने शेतकऱ्याला बनावट नोटा दिल्या . शेतकऱ्याने या नोटा खऱ्या नसल्याचे सांगताच या तरुणाने तेथून धूम ठोकली. मात्र बाजारात आलेल्या इतर तरुणांनी आरोपीला पकडले.

बनावट नोटा देऊन शेतकऱ्याच्या बकऱ्या मोहोळकडे घेऊन जात असताना असताना शेटफळ जवळ सदरची गाडी पकडण्यात आली आणि दोन्ही आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिले . पोलिसांनी आरोपीकडून 67 हजाराच्या बनावट नोटा ताब्यात घेतल्या आहेत. या बनावट नोटा बनवणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे .

Maharashtra Mutton Price Hike | बर्ड फ्लूच्या भितीने मटणाचे दर भिडले गगनाला, सामान्यांच्या खिशाला कात्री

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
पुण्यात मोठी कारवाई, क्रूड ऑइलच्या गुंतवणुकीतून लाखोंच्या कमाईचे आमिष; आरोपीकडून 2 कोटी 74 लाखांची फसवणूक
पुण्यात मोठी कारवाई, क्रूड ऑइलच्या गुंतवणुकीतून लाखोंच्या कमाईचे आमिष; आरोपीकडून 2 कोटी 74 लाखांची फसवणूक
Ashok Kharat Case: अशोक खरातच्या अडचणी वाढल्या! आर्थिक फसवणूक प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
अशोक खरातच्या अडचणी वाढल्या! आर्थिक फसवणूक प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
' ती क्लिप एआयने बनवलेली' वाल्मिक कराडचा कथित कॉल गेलेल्या सुग्रीव कराडची पहिली प्रतिक्रिया; बजरंग सोनवणेंच्या आरोपावर काय म्हणाला?
' ती क्लिप एआयने बनवलेली' वाल्मिक कराडचा कथित कॉल गेलेल्या सुग्रीव कराडची पहिली प्रतिक्रिया; बजरंग सोनवणेंच्या आरोपावर काय म्हणाला?

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget