(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कल्याणमध्ये 78 लाख 49 हजारांची वीजचोरी उघडकीस, 13 बंगला मालकांवर कारवाई
Kalyan Electricity theft: टुमदार घर म्हणजेच बंगला बनवायचा कोट्यवधी रुपये खर्च करायचे. मात्र बंगल्यातील उपकरणांना वीज चोरीची वापरायची. असाच काही प्रकार कल्याणमध्ये घडल्याचं समोर आलं आहे.
Kalyan Electricity theft: टुमदार घर म्हणजेच बंगला बनवायचा कोट्यवधी रुपये खर्च करायचे. मात्र बंगल्यातील उपकरणांना वीज चोरीची वापरायची. असाच काही प्रकार कल्याणमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. महावितरणने कल्याण पूर्वेतील 13 बंगल्यातील वीज चोरी उघडकीस आणली आहे. या श्रीमंत मंडळींनी वर्षभरात थोडे थोडके नव्हे तर तब्बल 74 लाख 49 हजारांची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने या बंगल्याच्या मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मिळावी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्व विभागातील उपविभाग एक अंतर्गत सर्वाधिक वीजहानी असलेल्या वीजवाहिन्यांवर वीजचोरी शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात 13 बंगले मालकांकडील 3 लाख 27 हजार युनिट विजेची चोरी पकडण्यात आली असल्याची माहिती आहे. यात भाल येथील एकाच बंगल्यात विनामीटर केबल टाकून सुरू असलेल्या 6 लाख 72 हजारांच्या वीज चोरीचा समावेश आहे. तर नेवाळी येथील एका जीन्स कारखान्याची 13 लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात आली. तसेच नेवाळी, धामटण, भाल, वसार, व्दारर्ली आदी परिसरात ही मोहीम राबवण्यात आली होती.
एकट्या ऑक्टोबर महिन्यात या परिसरात 59 वीज चोरट्यांविरुद्ध कारवाई करून 68 लाख 47 हजार रुपयांच्या वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. संबंधितांना वीजचोरीचे देयक व दंडाची रक्कम भरण्याबाबत कळवण्यात आले असून ही रक्कम न भरणाऱ्यांविरुद्ध वीज कायदा 2003 च्या कलम 134 नुसार गुन्हे दाखल होण्यासाठी पोलिसांत फिर्याद देण्यात येणार आहे. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर व कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड, उपकार्यकारी अभियंता जितेंद्र प्रजापती व त्यांच्या टिमने ही कामगिरी केली. वीजचोरी शोध मोहीम यापुढे नियमितपणे राबविण्यात येणार असून आगामी काळात ती अधिक तीव्र करण्यात येणार आहे. वीजचोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा व दंडाची तरतूद असून कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर करू, नये तसेच अधिकृत वीजजोडणी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. दरम्यान, अशा प्रकरणांना आला बसावा म्हणून महावितरण जण जागृती सोबतच कारवाईही करत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: