ठाणे: आठ वर्षाची मुलगी घरी एकटी असल्याची संधी साधत दोन चोर घरात घुसले, मुलगी वॉशरूममध्ये असताना त्या मुलीला बांधून तिच्या तोंडात कपड्याचा गोळा कोंबून घरातील रोकड आणि सोन्याचे दागिने असे मिळून एक लाख 90 हजाराचा मुद्देमाल लंपास केला. चोरटे इथेच थांबले नाही तर त्यांनी या मुलीला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. मुलीने धाडस दाखवत हिसका देत पुन्हा घराच्या दिशेने पळ काढला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास डोंबिवली पूर्व (Dombivli Crime) परिसरात  घडली. 


भरवस्तीत घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. 


डोंबिवली पूर्वेतील नांदीवली टेकडी परिसरात राहणाऱ्या त्या मुलीचे वैद्यकीय व्यवसायात असलेले वडील कामावर गेले. आई शेजारी काही कामानिमित्त गेली होती. याच वेळी अचानक एक व्यक्ती घरात घुसला. त्यावेळी घरात आठ वर्षाची मुलगी वॉशरुममध्ये गेली होती. हा अज्ञात व्यक्ती वाशरुममध्ये घुसला. त्याने त्या मुलीचे हात पाय आणि तोंड बाधून बाल्कनीत ठेवले आणि घराची झडती सुरु केली. 


त्याने घरातील हॉल, बेडरुमसह संपूर्ण घरात शोध घेतला. या चोरट्याला घरातील देव्हाऱ्यात ठेवलेले आठ तोळ्याचे मंगळसूत्र आणि रोकड मिळाली. त्याचा साथीदार दुसरा चोरटा दाराआड लपून बसला होता. चोरी करुन झाल्यावर त्या दोघांनी त्या मुलीला उचलून घेतले आणि ते जिना उतरत होते. त्यावेळी मुलीने प्रतिकार केला. त्यांच्या तावडीतून ती निसटली आणि पुन्हा घरात आली. 


घरी आई आल्यानंतर तिने सर्व प्रकार तिला सांगितला. यानंतर मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. इमारतीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहेत. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. डोंबिवलीत दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.


भिवंडीत सेक्स वर्करची हत्या, एक क्लू सापडला


भिवंडीत एका सेक्स वर्कर महिलेच्या हत्येच्या घटनेनंतर 48 तासांत आरोपीला अटक करून खुनाचा छडा लावण्यात यश मिळाले आहे. आरोपीचे नाव आकाशकुमार उर्फ पप्पू देवेंद्र मलिकला आहे. आकाशने भिवंडीत एका सेक्स वर्कर महिलेची डोक्यात पाटा वरवंटा घालून निर्घृण हत्या केली होती.  पोलिसांनी घटनेच्या 48 तासांच्या आत आरोपी आकाशकुमार उर्फ पप्पू देवेंद्र मलिक याला पश्चिम बंगाल येथून  अटक करून खून प्रकरणाचा छडा लावला. हत्येनंतर ओडिसा राज्यात पळून जात असताना  पश्चिम बंगाल येथील खरगपूर रेल्वे स्थानकात पकडण्यात आले आहे. 


भिवंडी शहरातील देह व्यापार करणाऱ्या महिलांची वस्ती असलेल्या हनुमान टेकडी या परिसरातील एका खोलीत मंगळवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास या महिलेची हत्या करण्यात आली. या महिलेच्या डोक्यात पाटा वरवंटा घालण्यात आला. मागील सहा सात महिन्यांपासून ही महिला या ठिकाणी राहत आहे. 21 नोव्हेंबर रोजी रात्री देह व्यापार करणाऱ्या सेक्स वर्कर महिलेसोबत तरुणाचे  भांडण झाले. वाद इतका विकोपाला गेला की, तरुणाने खोलीतील दगडी पाटा वरवंटा महिलेच्या डोक्यात मारून तिची हत्या केली आणि पळून गेला. या वेळी घटनास्थळी तातडीने पोलिस पथकासह दाखल झाले. 


ही बातमी वाचा: