Bigg Boss 17: छोट्या पडद्यावरील बिग बॉस सीझन 17 (Bigg Boss 17) हा रिअॅलिटी शो सध्या चर्चेत आहे. या शोमध्ये सहभागी झालेले  अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) हे जोडपे देखील चर्चेत आहे. अंकिता आणि विकी यांच्यातील रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाल्यापासून वाद होत आहेत. बिग बॉस 17 च्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये अंकिता आणि विकीची आई आली होती. यावेळी विकीच्या आईनं अंकिता आणि विका समजवण्याचा प्रयत्न केला. पण नेटकरी सध्या विकीच्या आईला ट्रोल करत आहेत.


विकीच्या आईला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल


बिग बॉसच्या एका एपिसोडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये विकीची आई आणि अंकिताची आई या दोघी विकी आणि अंकिताला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अंकिताची आई जेव्हा बोलण्याचा प्रयत्न करते तेव्हा विकीची आई सतत त्यांना आडवत असते. विकीच्या आईनं अंकिताच्या आईला दिलेली ही वागणूक पाहिल्यानंतर आता नेटकरी विकीच्या आईवर भडकले आहेत.


नेटकऱ्यांच्या कमेंट्स


बिग बॉसच्या एपिसोडच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी विकीच्या आईला ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, विकीची आई ललित पवार यांच्यासारखी आहे" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "ज्याप्रकारे विकीची आई नेहमी अंकिताच्या आईलान बोलण्यास सांगत होती, त्यावरुव वाटत आहे की, त्या अनादर करत आहेत.  त्यांनी परस्परांना आदर द्यायला हवा."


पाहा व्हिडीओ:






सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अंकिताने विकीच्या आईला सांगितले की, 'आई, मी त्याची काळजी घेईन'. यावर विकीची आई म्हणते, 'नाही, तू त्याची काळजी घेत नाहीयेस. तो रडत आहे' व्हिडीओमध्ये दिसते की,  अंकिता तिच्या आईकडे पाहते आणि म्हणते, 'मम्मी, माझे तुझ्यावर प्रेम आहे',  यावर तिची आई उत्तर देते, 'माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, बेटा', आईला पाहून विकी जैन देखील भावूक होतो.


संबंधित बातम्या:


Ankita Lokhande Vicky Jain : अंकिता लोखंडेने पती विकी जैनला चप्पलने मारलं; 'Bigg Boss'च्या घरात तणावाचं वातावरण