ठाणे: मुंबईतून अनेक घरफोड्या करून उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) पळून गेलेल्या एका सराईत घरफोड्याला मानपाडा पोलिसांनी (Manpada Police) अटक केली आहे. त्यासाठी मानपाडा पोलिसांनी आझमगडमध्ये जाऊन वीटभट्टी कामगारांचा वेश परिधान केला आणि गुन्हेगार (Crime News) समोर येताच त्याला अटक केली. राजेश अरविंद राजभर असे या सराईत गुन्हेगाराचं नाव असून त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी 22 गुन्ह्यांची नोंद आहे. 


वीटभट्टी कामगारांच्या वेशात  सापळा रचला


सदर आरोपीच्या शोधासाठी एक पोलीस पथक तयार करून आजमगड, उत्तरप्रदेशमध्ये पाठवण्यात आलं होतं. सदर पथकाने आरोपीच्या येण्या-जाण्याच्या मार्गाची माहिती काढून त्या मार्गावर असलेल्या विटभट्टी कारखान्यावर थांबून कामगारांप्रमाणे पेहराव करून सापळा लावला.
 
सदर पोलीस पथकाने आरोपीस पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून त्यास उत्तरप्रदेश येथून ताब्यात घेतले.त्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्या त्याच्याकडून पोलिसांनी 21 लाख 26 हजार रुपयांचे सोने हस्तगत केले आहे. या  आरोपीवर  22 गुन्हे दाखल असून मनापाडा पोलिस ठाणे, महात्मा फुले, पनवेल, अर्नाळा सागरी, अंबरनाथ, कोळसेवाडी, बदलापूर, शिवाजीनगर, डोंबिवली, डायघर या ठिकाणी हे सर्व गुन्हे दाखल आहेत.


रेल्वे रुळावरून जाणाऱ्या प्रवाशी महिलेवर कैचीने वार


रेल्वे प्रवास करून इच्छित स्थळी जाण्यासाठी रेल्वे रुळावरून जाणाऱ्या एका महिलेचा चोरट्याने पाठलाग करत अचानक तिच्यावर कैचीने वार करून गळ्यातील मंगळसूत्र , कानातील बाली आणि  मोबाईल असा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात त्या चोरट्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केली होती. त्यानंतर  दागिने घेऊन धूम ठोकणाऱ्या चोरट्याला गस्तीवरील रेल्वे पोलिसांनी  (Dombivli Crime) काही वेळातच गजाआड केले आहे. लालबहादूर बाकेलाल यादव (वय 24, रा. पीएनटी कॉलनी , डोंबिवली पूर्व ) असे अटक चोरट्याचे नाव आहे. 


लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार प्रवासी महिला संध्या नागराळ, वय 54 या बदलापूर पूर्वेकडील चिंतामण चौकात असलेल्या एका इमारतीत कुटूंबासह राहतात. त्या डोंबिवलीत काही कामानित्ताने 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास बदलापूरहून आल्या होत्या. 


त्यानंतर लोकलने डोंबिवली (Dombivli Railway Station) रेल्वे स्थानकातून कोपर रेल्वे स्थानकापर्यंत प्रवास करून त्या कोपर रेल्वे स्थनाकात उतरून ईस्टच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे रुळावरून  इच्छित स्थळी जाण्यासाठी रेल्वे रुळावरून पायी जात होत्या. त्यावेळी रात्री 8 वाजून 52 मिनिटाने त्यांचा अनोखळी चोरट्याने पाळत ठेवून अचानक  संध्या यांच्यावर त्याने  कैचीने वार करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र , कानातील बाली आणि  महागडा मोबाईल असा मुद्देमाल हिसकावून पळून गेला.  


ही बातमी वाचा: