एक्स्प्लोर

डोंबिवलीमधील धक्कादायक घटना, अनधिकृत बांधकामाची तक्रार केली म्हणून घरावर महिलांनी केला हल्ला

Crime News Update : डोंबिवली पश्चिमेतील कोपर परिसरात सुधाकर पावशे आपल्या कुटुंबासोबत राहतात. काही महिन्यापूर्वी त्यांच्या जागेवर एका इमारतीचे काम सुरु झाले.

Dombivli Crime News Update : अनधिकृत बांधकामाची तक्रार केली म्हणून तक्रारदारच्या घरावर हल्ला करण्यात आल्याची घटना डोंबिवली कोपर परिसरात घडली आहे. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी विष्णू नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय. मात्र घटनेमुळे तक्रारदार व त्याचे कुटुंबीय दहशतीच्या छायेत आहेत. तक्रारीत शिंदे गटाचा एका माजी नगरसेवक या भूमाफियाला  पाठीशी घालत असल्याचा आरोप पिडीत कुटुंबियांनी केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. अनधिकृत बांधकामाची तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या घरावर हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरु आहे. 

डोंबिवली पश्चिमेतील कोपर परिसरात सुधाकर पावशे आपल्या कुटुंबासोबत राहतात. काही महिन्यापूर्वी त्यांच्या जागेवर एका इमारतीचे काम सुरु झाले. सुधाकर पावशे यांनी या प्रकरणाची तक्रार महापालिकेकडे केली. महापालिकेने कारवाईचे आश्वासन दिले मात्र कारवाई केली नाही. सुधाकर पावशे यांच्या तक्रारीची दखल लोकायुक्तांनी घेतली. लोक आयुक्तांनी ही अनधिकृत इमारत पाडण्याचे आदेश दिले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी निवडणूकीचे कारण देत कारवाई टाळली. पावशे यांनी पाठपुरावा केल्यावर केडीएमसीने मंगळवारी सकाळी कोपरमधील या अनधिकृत इमारतीवर कारवाई केली. त्यानंतर सुधाकर पावशे यांच्या घरासमोर काही महिला आल्या.

महिलांनी आरडाओरड करत सुधाकर पावशे यांना घराबाहेर या असे सांगितले. सुधाकर पावशे घराबाहेर आले नाहीत. तेव्हा महिलांनी  त्यांचे दार जोर जोरात ठोठावले. त्यांची नेम प्लेट तोडली. घराच्या बाहेरच्या वस्तूंची नासधुस केली. या प्रकरणी हल्ला करणारया महिलांच्या विरोधात विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सुधाकर पावशे यांनी, एक तर माझ्या जागेवर अनधिकृत बांधकाम होत आहे. त्याची तक्रार केली. तर महापालिका दुर्लक्ष करते. कारवाई थातूरमातूर केली जाते. भूमाफिया माझ्या घरावर हल्ला करतात.या भुमाफियाला शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवक पाठीशी घालत असल्याचा आरोप तक्रारदार सुधाकर पावशे यांनी केलाय .आज आम्ही घराबाहेर पडून शकत नाही. मी आपल्या घरातच कुटुंबियांसह राहतो. बाहेर पडत नाही. सरकारने या घटनेकडे लक्ष द्यावे. मुख्यमंत्र्यानी या घटनेची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी पावशे यांनी केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Pune Leopard Attack : गोठ्यात झोपलेली; पहाटे तीनच्या सुमाराच्या तो आला अन्...; चिमुरडी किंचाळल्यानंतर आई-वडिलांनी पाहिलं, तोपर्यंत तिला बिबट्यानं जबड्यात धरून उसात धूम ठोकली
गोठ्यात झोपलेली; पहाटे तीनच्या सुमाराच्या तो आला अन्...; चिमुरडी किंचाळल्यानंतर आई-वडिलांनी पाहिलं, तोपर्यंत तिला बिबट्यानं जबड्यात धरून उसात धूम ठोकली
डॉक्टरांना मारहणा प्रकरण! आरोपी रमेश म्हात्रेला व्हीआयपी ट्रीटमेंट, उच्च न्यायालयाकडून ठाणे पोलिसांची खरडपट्टी 
डॉक्टरांना मारहणा प्रकरण! आरोपी रमेश म्हात्रेला व्हीआयपी ट्रीटमेंट, उच्च न्यायालयाकडून ठाणे पोलिसांची खरडपट्टी 
Kalyan Crime : संपत्तीच्या वादातून मित्रानेच काढला शिक्षिकेचा काटा, ATM चा वापर करुन पैसेही काढले, दोन आरोपींना अटक 
Kalyan Crime : संपत्तीच्या वादातून मित्रानेच काढला शिक्षिकेचा काटा, ATM चा वापर करुन पैसेही काढले, दोन आरोपींना अटक 
Ambernath Crime News: मुलामुळे दोघांच्या शारीरिक संबंधांमध्ये अडथळा; आईच्या प्रियकराने वरवंटा मारला, चिमुकल्याने जीव गमावला, अंबरनाथमधील धक्कादायक घटना
मुलामुळे दोघांच्या शारीरिक संबंधांमध्ये अडथळा; आईच्या प्रियकराने वरवंटा मारला, चिमुकल्याने जीव गमावला, अंबरनाथमधील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget