एक्स्प्लोर

Thane : मोबाईल चार्जिंगला लावण्यावरुन वाद, दोघांच्या वादात तिसऱ्या मित्राचा खून

Thane News : क्षुल्लक कारणावरून आजकाल भांडणं होण्याचे प्रमाण वाढले असून ठाण्यातून अशीच एक घटना समोर आली आहे.

Thane Crime News : क्षुल्लक कारणावरून तरुणांमध्ये भांडण होऊन मग त्याचे रूपांतर हत्येमध्ये घडल्याचे प्रकार सध्या सर्रास समोर येत आहेत. असाच एक प्रकार ठाण्यातील वर्तकनगर परिसरात घडला आहे. मोबाईल चार्जिंगवरुन झालेल्या भांडणात एका तरुणाची थेट हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणात तीन युवकांना अटक करण्यात आली आहे. रागावर नियंत्रण न राहिल्यामुळे तरुणांकडून अशा प्रकारचे गुन्हे घडण्याच्या प्रमाण हल्ली वाढल्यामुळे पालकांची आणि पोलिसांची चिंता वाढू लागली आहे.

तरुणाचं सळसळतं रक्त, त्यात रागावर नियंत्रण नाही आणि याचा परिणाम मग हातून कोणता न कोणता गुन्हा घडत आहे. याला इंटरनेटचा अधिक वापर, हिसंक गेम जबाबदार असून यामुळे तरुण रागीट बनत आहेत. याच रागाच्या परिणामामध्ये एका तरुणाची हत्या ठाण्यात झाली आहे. ठाण्यातील लोकमान्य नगर येथे मोबाईल चार्जिंगवरून साहिल आणि अभिषेक या दोघांमध्ये आपापसात  वाद झाला. हा वाद नेमका काय? हे जाणून घ्यायला त्यांचा मित्र सुमित गेला असता, साहिल आणि अभिषेक यांना सुमितचा भयंकर राग आला. याच रागातून त्यांनी अन्य मित्रांच्या सहाय्याने धारदार शस्त्राने अंगावर वार करत सुमितवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सुमितचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान वर्तकनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर दोन आरोपी फरार आहेत. ठाणे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान पाच पैकी एक आरोपी अल्पवयीन असल्याचं समोर आलं आहे. सदर आरोपींची पार्श्वभूमी पाहता त्यांचा क्राईम रेकॉर्ड असल्याचं निदर्शनात आलं आहे. पुढील तपास वर्तकनगर पोलीस करत आहेत. 

हे ही वाचा-

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live

 

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Khalil Shaikh Ravindra Dhangekar : खलिल शेख आत्महत्या प्रकरणात रविंद्र धंगेकर अडचणीत, 10 जणांवर गुन्हा दाखल, अटकेची शक्यता 
खलिल शेख आत्महत्या प्रकरणात रविंद्र धंगेकर अडचणीत, 10 जणांवर गुन्हा दाखल, अटकेची शक्यता 
धक्कादायक! जळगावात धावत्या बसमधून सराफा व्यवसायिकाची 25 लाखांची बॅग लंपास, 24 तासाच्या आत चार आरोपींना अटक
धक्कादायक! जळगावात धावत्या बसमधून सराफा व्यवसायिकाची 25 लाखांची बॅग लंपास, 24 तासाच्या आत चार आरोपींना अटक
Siya Goyal : केतन अग्रवाल हत्येप्रकरणी पोलिसांना चकवा देण्यासाठी प्लॅन, सिया गोयल-चेतन चौधरीनं जपानी व्हिडिओ पाहिले, चौकशीत धक्कादायक बाब समोर 
केतन अग्रवाल हत्येप्रकरणी पोलिसांना चकवा देण्यासाठी प्लॅन, सिया गोयल-चेतन चौधरीनं जपानी व्हिडिओ पाहिले
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
Embed widget