Dhule Crime News : अवैध शस्त्र निर्मितीसाठी कुख्यात असलेल्या उमर्टी येथून 5 पिस्तुले आणि 11 काडतूस खरेदी करुन निघालेल्या जालना जिल्ह्यातील दोन संशयितांना सांगवी पोलिसांनी (Dhule Police) पाठलाग करून अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन लाख दोन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध शस्त्र बाळगून असलेल्या या दोघांवर पोलिसांची नजर पडली. त्यानंतर पोलिसांना पाहताच हे दोघे बाजरीच्या शेतात पळून गेले. पोलिसांना संशय येताच या दोन्ही संशयितांचा पाठलाग करुन त्यांना अटक करत झडती घेतली असता, त्यांच्या ताब्यातून 5 पिस्तूल आणि 11 जिवंत काडतुसे जप्त करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.


5 बनावट पिस्तूल आणि 11 जिवंत काडतुसे जप्त 


शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे भुषण पाटील, संजय भोई, स्वनील बांगर, योगेश मोरे, कृष्णा पावरा, अल्ताप मिर्झा यांनी मध्यप्रदेश कडून शिरपूर तालुक्यातील खामखेडा फाट्याजवळ सापळा लावला होता. दरम्यान, तेथे एम एच 20 एफ ई 5363 क्रमांकाच्या मोटरसायकलीने दोन जण संशयितरित्या येतांना पोलिसांना दिसून आले. त्यानंतर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही संशयितांनी मोटरसायकलचा वेग वाढून शिरपुरच्या दिशेने पळ काढला. दरम्यान, त्यांनी आपली दुचाकी सोडून रस्त्यात असलेल्या बाजरीच्या शेतात पळ काढला. 


पोलिसांच्या पाठलागात झाले पितळ उघड


त्या दोघांचा पोलीस पथकाने बाजरीच्या शेतात पाठलाग केला असता त्यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडे पांढऱ्या रुमालात गुंडाळून ठेवलेले 5 बनावट पिस्तूल आणि 11 जिवंत काडतुसे मिळुन आलीत. दोघांची विचारपूस केली असता मध्यप्रदेश राज्यातील उमर्टी येथून त्यांनी ही शस्त्रे घेतल्याचे सांगितले. दोघांनी स्वताचे नाव बाबासाहेब रामभाऊ मिसाळ (रा. जालना) आणि परमेश्वर भाऊसाहेब मिसाळ (रा. जालना) असे सांगितले असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू केल्याची प्रतिक्रिया पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिलीय.


इतर महत्वाच्या बातम्या