धुळे : गडचिरोलीत दोन दिवसांपूर्वीच अवैध दारुचा (Liquor)  साठा जप्त करण्यात आला होता. पोलिसांनी खबऱ्याच्या माहितीच्या आधारे सापळा रचून दोन वाहनांसह लाखो रुपयांची देशी-विदेशी दारु ताब्यात घेतली होती. आता, धुळे (Dhule) तालुक्यातील वार शिवारातील एका इसमाच्या शेतातील घरामध्ये बनावट देशी दारूचा कारखाना चालवण्यात येत होता. पश्चिम देवपूर पोलिसांनी शेतातीर घरात सुरू असलेला हा कारखाना उध्वस्त केला आहे. या कारवाईत 63 हजार 840 रूपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्यांसह इतर साहित्य मिळुन एकूण 4 लाख 30 हजार 850 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.


सहाय्यक पोलिस अधीक्षक एस. ऋषीकेश रेड्डी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पो.नि. सुरेश शिरसाठ यांनी पोउनि मनोज कचरे, पोहेकॉ कुणाल साळवे, पंडीत मोरे, पोकॉ सुनिल राठोड, सनी सरदार, अतुल जाधव, किरण भदाणे, चालक पोकॉ अमोल सोनवणे, वाल्मीक पाटील तसेच आझादनगर पोलीस ठाण्याचे पोकॉ गौतम सपकाळ यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर,  पोलीस पथकाने मंगळवारी रात्री एक वाजेच्या सुमारास धुळे तालुक्यातील वार शिवारात महेंद्र राजाराम चव्हाण याच्या शेतातील घरावर छापा टाकला. या छाप्यात 63 हजार 940 रूपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या व इतर साहित्य मिळुन एकूण 4 लाख 30 हजार 850 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


पोलिसांनी वार शिवारातील शेतात धाड टाकली असता, पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये देशी दारुच्या बाटल्या भरल्याचं दिसून आलं. तसेच, या बाटल्यांनी भरलेले बॉक्स एकावर एक असे रचण्यात आले होते. तर, बाजुलाच बांधण्यात आलेल्या खोल्यांमध्ये बनावट दारु बनवण्याचे साहित्यही आढळून आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तेथील सर्वच अवैध व बनावट मद्यसाठा जप्त केला असून संबंधितावर कारवाई करण्यात आली आहे.


हेही वाचा


Bhandara News : बेशिस्त वाहनधारकांवर थेट दंडात्मक कारवाईचा बडगा; तुमसरच्या लेडी सिंघम अ‍ॅक्शन मोडवर