एक्स्प्लोर

Santosh Deshmukh : संतोष देशमुख केस मागे घेण्यासाठी दबाव टाकला, माझ्या खच्चीकरणासाठी प्रयत्न केले गेले; धनंजय देशमुखांचा दावा

Santosh Deshmukh Case : भाजपचे आमदार सुरेश धस, धनंजय देशमुख आणि त्यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांनी बीडच्या जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेतली. 

बीड : मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता वेगळं वळण मिळत असल्याचं चित्र आहे. धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांनी तुरुंगातून सुटल्यानंतर त्यासंबंधी एक दावा केला होता. त्या दाव्याला धनंजय देशमुखांनी बळकटी देणारं वक्तव्य केलं. संतोष देशमुख केस मागे घेण्यासाठी आपल्याला एका ठिकाणी बोलावण्यात आलं होतं, असा दावा धनंजय देशमुखांनी केला. 

भाजप आमदार सुरेश धस, धनंजय देशमुख आणि त्यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली. मस्साजोग गावात होणाऱ्या चोऱ्या घरफोडी आणि विविध विषयांवर पोलीस अधीक्षक कार्यालयात तासभर पोलीस अधीक्षकांशी चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. 

खिंडकरांच्या दाव्याला दुजोरा

धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांनी त्यांच्यावरील असलेल्या गुन्ह्यातून सोडण्यासाठी सरपंच देशमुख हत्या प्रकरणाची केस मागे घेण्यासंदर्भात समेट घडून आणण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा केला होता. याला धनंजय देशमुख यांनी दुजोरा दिला.

धनंजय देशमुख म्हणाले की, "संतोष देशमुख प्रकरण मिटवण्यासाठी मला एका जागेवर बोलावून घेण्याचं षडयंत्र होतं. त्यातील एका साक्षीदाराने बोलावून घेऊन हे प्रकरण मिटवू असे म्हटलं. मात्र त्यांनी ज्या ठिकाणी बोलावलं तिथे मी गेलो नाही. दादासाहेब खिंडकर प्रकरणाची तुलना संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी करण्यात आली. मी 13 महिन्यानंतर यावर बोलत आहे. माझी बदनामी, खच्चीकरण कसे होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मी न्यायासाठी लढत आहे आणि लढत राहीन."

मस्साजोग गावची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा होती. परंतु लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, असंही धनंजय देशमुख म्हणाले. 

काय म्हणाले होते दादासाहेब खिंडकर? 

धनंजय देशमुखांचे साडू दादासाहेब खिंडकर हे 13 महिन्यानंतर तुरुंगातून सुटून बाहेर आहे. त्यानंतर त्यांनी संतोष देशमुख प्रकरणी मोठा दावा केला. जुन्या व्हिडीओच्या आधारे आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आणि फसवण्यात आले. त्यानंतर आपल्यावरी गुन्हा मागे घेण्यासाठी संतोष देशमुखांची केस मागे घ्यावी असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, असा दावा दादासाहेब खिंडकर यांनी केला. 

आपल्यावर ज्यांनी खोटे आरोप केले ते लोक नशाबाज आणि गुंड असल्याचा दावाही खिंडकरांनी केला. त्या नशाबाज लोकांनी गावातल्या अनेक लोकांवर खोटे गुन्हे नोंद त्रास दिल्याचं ते म्हणाले. 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Satara Accident News: कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
Tuljapur Sameer Patel Death Case: मुलीचा पाठलाग केल्याच्या कारणावरून वाद; समीर पटेलला संपवलं, तुळजापुरात थरार, माजी नगराध्यक्ष संतोष कदमसह दोघांना अटक
मुलीचा पाठलाग केल्याच्या कारणावरून वाद; समीर पटेलला संपवलं, तुळजापुरात थरार, माजी नगराध्यक्ष संतोष कदमसह दोघांना अटक
Chhatrapati Sambhajinagar: तरुणाला घरातून ओढत नेलं, झाडाला बांधून तलवारी, रॉड, कुऱ्हाडीने मारलं, दगडाने पाय ठेचले, स्क्रू ड्रायव्हर खुपसून जीव घेतला अन्..., संभाजीनगरमध्ये जुन्या वादातून भयानक घडलं
तरुणाला घरातून ओढत नेलं, झाडाला बांधून तलवारी, रॉड, कुऱ्हाडीने मारलं, दगडाने पाय ठेचले, स्क्रू ड्रायव्हर खुपसून जीव घेतला अन्..., संभाजीनगरमध्ये जुन्या वादातून भयानक घडलं
तुळजापुरात प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोघांना अमानुष मारहाण; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी, 6 जणांविरुद्ध गु्न्हा दाखल
तुळजापुरात प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोघांना अमानुष मारहाण; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी, 6 जणांविरुद्ध गु्न्हा दाखल

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Cristiano Ronaldo Retirement : क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती, व्हिडिओ जारी करत थेट निर्णय सांगितला...
क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर पण एक स्वप्न अधुरं राहिलं...
Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
Embed widget