मुंबई : उत्तर प्रदेश ( Uttar Pradesh ) येथील कौशांबी जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक प्रकरामुळे एकच खळबळ माजली. घरात कुणीही नसल्याचा फायदा घेत घरातील नोकराने मालकीणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप महिलेने केला आहे.. त्यावेळी स्वतःचा बचाव करत या महिलेने घरातील चाकूच्या साह्याने नोकराच्या गुप्तांगावर वार केला. सध्या या नोकरावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच या प्रकरणात पोलिसांनी संबंधित महिलेला अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
उत्तर प्रदेश ( Uttar Pradesh ) मधील शरीफपूर गावतील मंजनपूर या पोलीस ठाण्याअंतर्गत हा संपूर्ण प्रकार घडला. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ माजली असल्याचं चित्र आहे. या घटनेतील पीडित महिलेचा नवरा हा सौदी अरेबिया येथे वास्तव्यास आहे. मागील अनेक दिवसांपासून या नोकराची लक्षणं काही चांगली नसल्याचा आरोप या महिलेने केला आहे. दरम्यान या नोकराचे वय 23 वर्ष आहे. दुपारी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत या नोकराने घरच्या मालकीणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण या नोकराने त्याच्यावर लावलेले सगळे आरोप हे खोटे असल्याचं म्हटलंय. या प्रकरणातील नोकराच्या वडिलांनी महिलेविरुद्ध तक्रार केली. दरम्यान या प्रकरणात महिलेविरुद्ध कलम 326 आणि 308 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळावरुन काही गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत.
महिलेचे आरोप नेमकं काय?
या प्रकरणात महिलेने नोकरावर बलात्कार केल्याचे आरोप केले आहेत. या महिलेने म्हटलं की, मी घरी एकटी असल्याचा फायदा घेत हा नोकर दुपारी माझ्या घरी आला. त्याने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मी त्याच्या तावडीतून सुटून स्वयंपाकघरात धावत गेले. त्यावेळी मी स्वयंपाकघरातून चाकू घेऊन आले. पण त्यावेळी पुन्हा त्याने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. स्वत:ला वाचवण्यासाठी मी त्याच्या शरीराच्या एका भागावर वार करत सुटका करुन घेतली.
आरोप खोटे असल्याचा नोकराचा दावा
या प्रकरणातमध्ये आरोप करण्यात आलेल्या नोकराने त्याच्यावरील सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. हा नोकर महिलेच्या घरी बालपणापासून कामाला आहे. त्याचप्रमाणे या महिलेने मला स्वत:हून तिच्या जवळ बोलावले असल्याचं नोकराचं म्हणणं आहे. त्यानंतर या महिलेने नोकराला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. माझ्या गुप्तांगावर वार करण्यात आला. मी शुद्धित आल्यानंतर संपूर्ण प्रकार माझ्या लक्षात आला. मी कसंतरी घरी पोहचलो आणि त्यानंतर माझ्या घरच्यांनी माला रुग्णालयात दाखल केले, असं या नोकराने म्हटलं आहे.
पोलिसांचा तपास सुरु
या प्रकरणात मंझनपुर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्थानाकाचे डीसीपी अभिषेक सिंह यांनी अधिक माहिती देताना म्हटलं की, या घटनेतील महिला आणि नोकर मध्ये वाद झाला होता. यामध्ये या महिलेने नोकराच्या गुप्तांगावर वार केला. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी पोहचून जखमी नोकराला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला प्रयागराज येथे हलविण्यात आले. नोकराच्या वडिलांच्या तक्रारीवरुन महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरु आहे.