पंढरपूर : "राष्ट्रवादीचे अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते आणि  राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील (Anil Patil) हे पुन्हा निवडून येणार नाहीत, याची काळजी घेऊ", असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी रणशिंग फुंकलं. शरद पवार (Sharad Pawar Solapur) आज सोलापूरच्या माढा (Madha) दौऱ्यावर आहेत. पक्षाच्या फुटीनंतर प्रथमच शरद पवार माढ्यात दाखल झाले. माढ्यातील कापसेवाडी (Kapsewadi) इथं कृषी निष्ठ परिवाराच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याला शरद पवारांनी उपस्थिती लावली. त्याआधी शरद पवारांनी माध्यमांशी चर्चा करताना विविध प्रश्नांना उत्तरं दिली. 
राज्यातील 48 जागांबाबत जागा वाटप बऱ्यापैकी पूर्ण झाले असून, उरलेल्या जगांचाही निर्णय आता दिवाळीनंतर होईल, असं शरद पवार म्हणाले. 


अधिवेशनानंतर शरद पवार आणि अजित पवार दोघे एकत्र येतील असं अनिल पाटील म्हणाले होते. त्याबाबत शरद पवारांना विचारण्यात आलं. शरद पवार म्हणाले, " मी हे सांगू इच्छितो, त्यांच्या मतदारसंघात (अमळनेर, जळगाव) मी जाऊन आलो. पुढच्या विधानसभेला ते निवडून आलेले दिसणार नाहीत. त्याची आम्ही काळजी घेऊ" 


दिवाळीतील गाठीभेटीवर भाष्य


यावेळी शरद पवारांनी अजित पवारांच्या भेटीवरही भाष्य केलं. शरद पवार म्हणाले, "राजकीय जीवन आणि व्यक्तिगत जीवन वेगळे आहे. आमच्या घराची पद्धत आहे, कुठेही असलो तरी, दिवाळीत एकत्र येतो"


पंतप्रधानांवर निशाणा (Sharad Pawar on PM Modi)


दरम्यान, शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं. "चार राज्यातील निवडणुकीत भाजपला दणका बसेल. माझ्या हयातीत पंतप्रधान कधी राज्यातील नेत्यांवर वैयक्तिक टीका करताना मी पाहिले नव्हतेय. मात्र आता ते नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) करत आहेत. प्रधानमंत्री सांगतात ज्या गोष्टी त्या पद्धतीचे राजकारण कधी पाहिले नाही. मी जवाहरलाल नेहरू यांचे भाषण पाहिले. पण असे कधी घडले नाही. पहिले मोदींसारखे पहिलेच प्रधानमंत्री पाहिले जे कुठल्याही राज्यात गेले की व्यक्तिगत हल्ले करतात. व्यक्तिगत हल्ला करणाऱ्या व्यक्तीच्या हातात देशाची सत्ता आहे", असं शरद पवार म्हणाले. 


देवाचं दर्शन विकत असतं का?


अयोध्येतील राम मंदिर दर्शनावरुन शरद पवारांनी गृहमंत्री अमित शाहांवर निशाणा साधला. "राम मंदिराचे दर्शन मोफत आहे असे सांगितले जाते. पण देवाचं दर्शन कुठं विकत असतं का?  कुठल्या पातळीपर्यंत राज्यकर्ते गेले याची चर्चाच नको" असं शरद पवार म्हणाले. 


सोलापूर आणि माढा आम्हीच जिंकणार (Solapur and Madha Lok Sabha)


सोलापूर (Solapur) आणि माढा (Madha)  अशा दोन्ही लोकसभा मतदार संघात आमची महायुती जिंकेल, असा विश्वास यावेळी शरद पवारांनी व्यक्त केला.


दोन पवार एकत्र आल्यावर काय घडतं कळेल (Sharad Pawar on Chandrakant Patil)


दरम्यान, शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं होतं. दोन पवार एकत्र आल्यावर काही तरी घडल्यावर समजते, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यावर पवार म्हणाले "दोन पवार एकत्र आल्यावर काय होतं ते निवडणुकीचा निकाल लागल्यावर कळेल" 


संबंधित बातम्या 


Sharad Pawar : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य खरं ठरलं! शरद पवार बांधावरुन भाऊबीजेसाठी थेट अजित पवारांच्या निवासस्थानी; अनेकांच्या भुवया उंचावल्या!