एक्स्प्लोर

Crime News : रेल्वे प्रवाशांना दमदाटी करून मोबाइल चोरणाऱ्यांना तिघांना अटक

Crime News : रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या तिघांना कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Crime News:  प्रवाशाला दमदाटी करत त्याच्या जवळील मोबाईल हिसकावून पळणाऱ्या तीन चोरांना रेल्वे पोलिसांनी अटक केली.  सीसीटीव्ही तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. शाहिद शेख, सागर म्हात्रे ,जयदीप राऊत अशी चोरांची नावे असून शाहिद शेख सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात याआधी देखील चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या तिघांमधील एक जण संधी साधत प्रवाशाला दमदाटी करत त्याचा मोबाईल हिसकवायचा त्यानंतर लक्ष विचलित करण्यासाठी हे तिघे विविध दिशेला पळून जात होते. पोलिसांनी या तिघांकडून आतापर्यंत चोरी केलेले सव्वा लाखांचे मोबाईल हस्तगत केले.

कल्याण रेल्वे स्थानकावर 17 फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एका प्रवाशाला तीन जणांनी दमदाटी केली. या प्रवाशा जवळील महागडा मोबाईल हिसकावून हे तिघेही पळून गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात  प्रवाशाने तक्रार दाखल केली. रेल्वे पोलिसांनी तत्काळ प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही तपासले. एका कॅमेरात तिघेही आरोपी कैद झाले. या सीसीटीव्हीच्या आधारे  आरोपीची ओळख पटवली. सीसीटीव्हीत दिसणारा आरोपी शाहिद शेख हा सराईत चोर होता. 

कल्याण रेल्वे पोलीसानी तत्काळ शाहिद याचा पत्ता शोधत कल्याण पश्चिमेकडील बैलबाजार परिसरात सापळा रचून अटक केली. शाहिदकडून पोलिसांनी चोरी केलेला मोबाईल हस्तगत केला याच दरम्यान सीसीटीव्ही दिसणारा त्याच्या आणखी दोन साथीदाराची देखील माहिती पोलिसांनी मिळवली. त्यानंतर सागर म्हात्रे  व जयदीप राऊत यांना देखील पोलिसांनी अटक केली. सराईत चोर शाहिद दोन साथीदार सागर आणि जयदीप च्या मदतीने तो प्रवाशांना लुटायचा. त्यानंतर पोलिस व प्रवाशांचे लक्ष विचलित करण्यासाठी हे तिघेही विविध दिशेला पळून जायचे. अखेर प्रवाशांना लुबाडणाऱ्या टोळीचा पोलिसांनी 24 तासात पर्दाफाश करत तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला, नाव विचारून छत्तीसगडच्या दोन मजुरांना संपवलं; 'लष्‍कर-ए-तैयबा'ने स्‍वीकारली भ्‍याड हल्‍ल्‍याची जबाबदारी
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला, नाव विचारून छत्तीसगडच्या दोन मजुरांना संपवलं; 'लष्‍कर-ए-तैयबा'ने स्‍वीकारली भ्‍याड हल्‍ल्‍याची जबाबदारी
डॉक्टरांना मारहाण प्रकरण! रमेश म्हात्रेला न्यालालयाचा दणका, जामीन देता येणार नसल्याचं स्पष्टीकरण, जेलमधील मुक्काम वाढला
डॉक्टरांना मारहाण प्रकरण! रमेश म्हात्रेला न्यालालयाचा दणका, जामीन देता येणार नसल्याचं स्पष्टीकरण, जेलमधील मुक्काम वाढला
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
Maharashtra Rain updates: मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
Embed widget