एक्स्प्लोर

सोलापुरात प्रतिष्ठित डॉक्टरकडून वृद्धाला बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद 

Solapur Crime News : एका प्रतिष्ठित डॉक्टरकडून वृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आलीय. सोलापूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

Solapur Crime News : सोलापुरात एका प्रतिष्ठित डॉक्टरकडून वृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आलीय. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. खरकटे पाणी अंगावर का टाकले विचारल्याने डॉक्टराने फायबर काठीने बेदम मारहाण केल्याचा आरोप या वृद्ध व्यक्तीने केलाय. डॉक्टर संदीप आडके असे मारहाण करणाऱ्या डॉक्टरांचे नाव. सोलापुरात प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ म्हणून आडके यांचे नाव आहे. तर  विजय चौधरी असे मारहाण झालेल्या वृद्धाचे नाव आहे. चौधरी हे गवंडी कामगार आहेत.  

डॉक्टरांकडून झालेल्या बेदम मारहाणीत चौधरी यांच्या हाताला पाच टाके पडले आहेत. याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. चौधरी यांच्या तक्रारीवरून डॉ. आडके यांच्या विरोधात भादवी कलम 323, 324 504, 506 अनुसार सदर बाजार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. संदीप आडके यांनी देखील विजय चौधरी यांच्या विरोधात सदर बाजार पोलिसात तक्रार दाखल केली आहे. चौधरी दारू पिऊन हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा डॉक्टरांनी आरोप केलाय. डॉक्टरांच्या तक्रारीनंतर गवंडी कामगार विजय चौधरी यांच्या विरोधातही अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे.

विजय चौधरी हे रस्त्यावरुन जात असताना डॉक्टर आडके यांच्या हॉस्पिटलमधून त्यांच्या अंगावर कुणीतरी खरकटे पाणी टाकले. विजय यांनी याबाबत हॉस्पिटलमध्ये जात डॉक्टरांना जाब विचारला. मात्र संतापलेल्या डॉक्टरने विजय यांना फायबर काठीने आपल्याला बेदम मारहाण केली, असे चौधरी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.  

पोलिसांकडून चौकशी सुरू

चौधरी यांना मारहाण झाल्यानंतर त्यांनी डॉक्टर आडके यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार सोलापुरातील सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. परंतु, यानंतर डॉक्टरांनी देखील चौधरी यांच्याविरोधात तक्रार दिली. त्यामुळे चौधरी यांच्या विरोधात देखील अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे पोलिस या घटनेची कसून चौकशी करत आहे. दोन्ही बाजूने गुन्हा दाखल केल्याने पोलिसांसमोर देखील तपास करण्याचे आव्हान आहे. परंतु, सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत. 

महत्वाच्या बातम्या

Crime News : सिगारेट आणून दिली नाही म्हणून मित्राकडून मित्राची हत्या, डोंबिवलीतील धक्कादायक घटना 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

बीडमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन, मृत विलास घुलेच्या पत्नीला भोवळ; पोलीस तात्काळ घटनास्थळी, कारवाईचं आश्वासन
बीडमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन, मृत विलास घुलेच्या पत्नीला भोवळ; पोलीस तात्काळ घटनास्थळी, कारवाईचं आश्वासन
Ketan Agrawal Murder Case Dr Muskan Soni Suspended: 'केतनला टक्कल होतं, अशांनी मेलेलंच बरं...'; केतन अग्रवालची फिदीफिदी हसून थट्टा उडवणं महागात, डॉक्टर महिलेचं पाच वर्षांसाठी निलंबन
'केतनला टक्कल होतं, अशांनी मेलेलंच बरं...'; केतन अग्रवालची फिदीफिदी हसून थट्टा उडवणं महागात, डॉक्टर महिलेचं पाच वर्षांसाठी निलंबन
Pune Police News: पोलीस उपनिरीक्षकाला कॅफेमध्ये केलेलं गैरवर्तन भोवलं; कॉफीचे ग्लास, खाद्य पदार्थ फेकले, कर्मचाऱ्यांशी अरेरावीची भाषा; व्हिडिओ व्हायरल होताच कारवाईचा बडगा
पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला कॅफेमध्ये केलेलं गैरवर्तन भोवलं; कॉफीचे ग्लास, खाद्य पदार्थ फेकले, कर्मचाऱ्यांशी अरेरावीची भाषा; व्हिडिओ व्हायरल होताच कारवाईचा बडगा
Ketan Agrawal Lohagadh Case Pune: रिक्रिएशनवेळी सियाच्या प्रियकराने केतनचा पुतळा लोहगडावरुन खाली ढकलला तेव्हा...; थरकाप उडवणारा VIDEO
रिक्रिएशनवेळी सियाच्या प्रियकराने केतनचा पुतळा लोहगडावरुन खाली ढकलला तेव्हा...; थरकाप उडवणारा VIDEO

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain News Updates: पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
पालघर, रायगडला रेड, मुंबई, ठाणे, वर्धा, नागपूरला ऑरेंज अलर्ट; राज्यभरात कोसळधारा, पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
Embed widget