एक्स्प्लोर

Crime News : मोबाइल गेम खेळत असल्याने आई रागावली; 16 वर्षाच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल

Crime News : दिवसभर मोबाइलवर गेम खेळत असल्याने आई रागावल्याने एका अल्पवयीन मुलाने आत्महत्या केली असल्याची घटना मुंबईत घडली आहे.

Crime News : आई-वडील रागावल्याने अल्पवयीन मुलांकडून टोकाचे पाऊल उचलले जात असल्याच्या घटना समोर येत आहे. अशीच एक घटना मुंबईत समोर आली आहे. मोबाइलवर सातत्याने गेम खेळत असल्याने आई रागावल्याने एका 16 वर्षीय मुलाने आत्महत्या केली असल्याचे खळबळजनक घटना घडली आहे. आईने रागावल्यानंतर मुलाने घर सोडले आणि लोकल रेल्वे समोर येत आत्महत्या केली. या अल्पवयीन मुलाने घरी सुसाइड नोट सोडली होती. बोरिवली रेल्वे पोलिसांकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. आत्महत्येच्या घटनेमुळे कुटुंबीयांसह परिसरावर शोककळा पसरली आहे. 

बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. ओम भरत असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. ओम दिवसभर मोबाइलवर गेम खेळत होता. त्याचवेळी संध्याकाळी ओमच्या आईने दिवसभर मोबाइलवर गेम खेळतो, मग अभ्यास कधी करणार असा जाब विचारत त्याच्या हातातून मोबाइल काढून घेतला. आई रागावल्याने ओमने रागाच्या भरात सुसाइड नोट लिहून घर सोडले. या पत्रात त्याने मी आत्महत्या करत  असून पुन्हा कधीच येणार नसल्याचे म्हटले. घरातल्यांनी सुसाइड नोट मिळताच दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी ओमचा शोध सुरू केला. 

या दरम्यान  दिंडोशी पोलिसांना मालाड आणि कांदिवली दरम्यान एका मुलाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांना तो मृतदेह ओमचा असल्याचे दिसून आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

दुर्देवी! आई-वडील रागावले म्हणून 25 वर्षाच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल

आई-वडील रागावल्याने एका 25 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील उमरद येथे ही घटना घडली आहे. एका शुल्लक कारणातून युवकाने टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चंद्रकांत भारत जाधव (वय 25) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. बीड तालुक्यातील उंबरद खालसा या गावाचा रहिवासी आहे चंद्रकांत हा भारत जाधव यांचा एकुलता एक मुलगा होता. बीडमध्ये शिवण काम करण्याचं काम करायचा. रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्याने वडिलांनी त्याला फोन करून विचारणा केली. त्यावेळी तो नशेत असल्याचं त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी वडिलांनी चंद्रकांतला त्यांनी  समज देऊन घरी लवकर येण्यास सांगितले होते. त्यानंतर त्याने घरी येत स्वत: च्या खोलीत जाऊन आत्महत्या केली.  

महत्त्वाच्या बातम्या

Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
Kolkata Crime Case Munmun Datta: आधी रस्त्यात गाठलं, शरीराचे लचके तोडले अन् मग तलावात फेकलं, 12 वर्षीय मुलीसोबत भयंकर घडलं, TMKOC फेम अभिनेत्रीचा संताप
आधी रस्त्यात गाठलं, शरीराचे लचके तोडले अन् मग तलावात फेकलं, 12 वर्षीय मुलीसोबत भयंकर घडलं, TMKOC फेम अभिनेत्रीचा संताप

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Iran War : अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, भारतात शेअर मार्केट क्रॅश, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर भडकले, पुन्हा युद्धाचं संकट 
अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, क्रूड ऑईलच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जगावर युद्धाचं पुन्हा संकट?
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
Building collapses in Moshi Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
शरद पवार अनेक वर्षांनी विधानभवनात, स्वागताला दिग्गज नेते; मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नारायण राणेही उपस्थित
शरद पवार अनेक वर्षांनी विधानभवनात, स्वागताला दिग्गज नेते; मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नारायण राणेही उपस्थित
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
Devendra Fadnavis: पैसे घेऊन सोशल मीडीयावर शिव्या देतात; मिसिंग लिंक टीकेवरुन फडणवीसांचा ट्रोलर्संना पलटवार, नाशिक ढगफुटीवरही बोलले
पैसे घेऊन सोशल मीडीयावर शिव्या देतात; मिसिंग लिंक टीकेवरुन फडणवीसांचा ट्रोलर्संना पलटवार, नाशिक ढगफुटीवरही बोलले
Weather Update: सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
Embed widget