Chhattisgarh Naxal : छत्तीसगढमधील (Chhattisgarh) नारायणपूर जिल्ह्यातील अबुझमाड भागातून मोठी बातमी समोर आली आहे. यात सुरक्षा रक्षकांची नक्षलवाद्यांशी (Naxlite) मोठी चकमक झाली आहे. या चकमकीत आतापर्यंत 8 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. तर या परिसरात अद्याप पोलिसांची नक्षलवाद्यांशी चकमक सुरू असून नक्षलवाद्यांच्या (Naxal) मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे या अंधाधुंद गोळीबारात एसटीएफचा एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, त्याची अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे. सध्या परिसरात अजून ही अभियान सुरू असल्यानें मारले गेलेल्या नक्षल्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
8 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश
नक्षल्यांच्या गड असलेल्या अबुझमाडच्या कुतुल, फरसाबेदा, कोडामेटा परिसरात मागील दोन दिवसांपासून संयुक्त नक्षलविरोधी अभियान सुरू आहे. या अभियानात नारायणपूर-कोंडागाव-कांकेर-दंतेवाडा दीआरजी (DRG), एसटीएफ (STF) आणि आयटीबीपी (ITBP) 53व्या कॉर्प्स या संयुक्त कारवाईत सामील आहेत. सध्याघडीला जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरूच असून पोलिसांच्या कारवाईला अद्याप 8 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
नक्षलविरोधी मोहिमेला मोठे यश
फेब्रुवारी ते मे महिन्याच्या दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे असे देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दरम्यान नक्षलावादी कारवाई करणाऱ्यांच्या विरोधात पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. अशातच आता पर्यंत सुरक्षा दलाच्या जवानांनी वेगवेगळ्या कारवाईत अनेक नक्षल्यांचे डाव उधाळून अनेकांचा खात्मा केलाय. अशातच छत्तीसगडमध्ये तब्बल 30 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने सुरक्षा दलाच्या जवानांना आणि नक्षल विरोधी मोहिमेला मोठे यश आल्याचे मानलं जात आहे.
14 जहाल माओवाद्यांचं आत्मसमर्पण
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकूण 14 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी आवाहन केलं आहे की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असून, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या