(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Crime News : पार्टी दिली नाही म्हणून चक्क गाडीच फोडली; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर शहरातील ब्रीजवाडी येथील उत्तरानगरी परिसरात ही घटना घडली आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Nagar Sambhaji City) एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, गाडी घेतल्याची पार्टी दिली नाही म्हणून तिघांनी चक्क गाडीच फोडल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, गाडी फोडल्यावर त्यात ठेवलेले चार हजार सातशे रुपये देखील लंपास केले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील ब्रीजवाडी येथील उत्तरानगरी परिसरात ही घटना घडली आहे. तर या प्रकरणी सय्यद शकील सय्यद चांद (वय 35 वर्षे, रा. उत्तरानगरी ब्रिजवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात तीघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकील सय्यद उत्तरानगरी येथे राहतात. दरम्यान सिध्दु, शाम आणि लखन हे देखील त्याच परिसरात राहतात. तर यापैकी शाम हा शकील यांच्या घराशेजारी राहतो. दरम्यान सिध्दु, शाम आणि लखन हे तिघेही शकील यांच्या घरासमोर आले. तसेच, नवीन गाडी घेतल्याची पार्टी कधी देणार असे म्हणू लागले. तसेच पार्टी दिली नाही तर तुझ्या गाडीचे बांधकाम करील असे म्हणून शकील यांच्याशी वाद घालून तिथून ते तिघेही निघून गेले. मात्र त्यानंतर 28 मार्च रोजी पुन्हा दारू पिऊन शकील यांच्या घरासमोर आले. तसेच शिवीगाळ करू लागले. शकील यांची चारचाकी (क्र. MH 20 GC 2438) गाडीच्या समोरील काच फोडली. तसेच गाडीत ठेवलेले चार हजार सातशे रुपये देखील पळवून नेले. त्यामुळे शकील यांनी सिडको एमआयडीसी पोलिसांत धाव घेऊन, तक्रार देत गुन्हा दाखल केला आहे.
पार्टी दिली नाही म्हणून गाडी फोडली...
तक्रारदार शकील सय्यद आणि आरोपी तीनही एकाच भागात राहतात. दरम्यान ते एकमेकांना ओळखतात. तर शकील हे कॉस्मेटीक माल पर्फ्यूम, अत्तर, मेकअप कीट विक्री करण्याचा व्यवसाय करतात. त्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांनी नवीन गाडी घेतली होती. तर याच गाडीची पार्टी देण्याची मागणी सिध्दु, शाम आणि लखन यांनी शकील यांच्याकडे मागीतीली होती. मात्र शकील यांनी काही त्यांना पार्टी दिली नाही. त्यामुळे याचाच राग तिघांना आला होता. दरम्यान दारूच्या नशेत त्यांनी शकील यांच्या गाडीची काच फोडून तोडफोड केली. त्यामुळे शकील यांचे मोठं आर्थिक नुकसान झाले आहे. तर त्यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
शहरातील शांतता भंग करणाऱ्या दोघांना एमपीडीएखाली स्थानबद्ध; छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई