Chhatrapati Sambhajinagar Crime News: जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट, 2 जणांचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगावात थरकाप उडवणारी घटना
Chhatrapati Sambhajinagar Crime News: छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगावात जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट झाला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime News: छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar Crime News) रांजणगावात जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट झाला आहे. किरकोळ भांडणातून सुरू झालेल्या वादानं इतकं टोक गाठलं की, दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली. यामध्ये साहिल आणि निहाल या दोघा भावांचा मृत्यू झाला आहे. तर या हल्ल्यात आणखी दोघे जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. 19 ऑक्टोबरला मध्यरात्रीच्या सुमारास शेंदुर्णीतील एकतानगर परिसरात ही थरारक घटना घडली.
साहिल आणि त्याचा भाऊ निहाल हे दोघे जखमी अवस्थेत आढळल्यानंतर दोघांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे, हल्ल्यानंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच वाळूज पोलिसांनी तपासाची चक्रं वेगानं फिरवली. हरियाणातील मूळ गावाकडे जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयितांना रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेण्यात आलं. सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथक करत आहे. मात्र या दुहेरी हत्येमागचं नेमकं कारण काय? जुन्या वादातून हा हिंसक संघर्ष कसा पेटला? आणि या हल्ल्यात आणखी कोणाची भूमिका होती? या प्रश्नांची उत्तरं आता पोलीस तपासातून समोर येणार आहेत. (Chhatrapati Sambhajinagar News)
मिरज तालुक्यातील गुंडेवाडीत रात्री तरुणाचा निर्घृण खून- (Sangli Crime News)
सांगलीमधील मिरज तालुक्यातील गुंडेवाडी येथे एका 30 वर्षीय तरुणाची चाकूने भोकसून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. सुनील तानाजी खांडेकर (वय ३०, रा. गुंडेवाडी, ता. मिरज) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे गुंडेवाडी परिसरात खळबळ उडाली असून, हल्लेखोर कोण आणि खूनामागचे नेमके कारण काय, याचा शोध पोलीस घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील खांडेकर हे रात्री आपल्या शेतात गेले होते. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्या पोटात चाकूचे वर्मी घाव घातल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रपरिवाराने त्यांना तातडीने उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि घटनेचा उलगडा करण्यासाठी मिरज ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
Before You Go
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO























