Chandrapur Crime News: शाळेच्या भिंतीवर मजकूर लिहिला, मुख्याध्यापकांची आई-वडिलांकडे तक्रार; चंद्रपूरमध्ये 14 वर्षीय विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल
Chandrapur Crime News: मुख्याध्यापकांनी रागावल्याच्या शुल्लक कारणातून चंद्रपूर शहरात नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Chandrapur Crime News: मुख्याध्यापकांनी रागावल्याच्या शुल्लक कारणातून चंद्रपूर (Chandrapur) शहरात नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीने (Student) आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेच्या भिंतीवर काही मजकूर लिहिल्याच्या कारणावरून मुख्याध्यापकांनी विद्यार्थिनीच्या आई-वडिलांकडे तक्रार केली होती. त्यानंतर आई-वडिलांनी शाळेत (School) जाऊन मुख्याध्यापकांची भेट घेतली. मात्र, त्यानंतर घरी परतल्यानंतर काही वेळातच विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. (Chandrapur Crime News)
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी चंद्रपूर शहरातील एका शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती. शाळेच्या भिंतीवर तिने काही मजकूर लिहिल्याचे मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आले. यानंतर मुख्याध्यापकांनी याबाबत तिच्या आई-वडिलांकडे तक्रार केली.
Chandrapur Crime News: आई-वडिलांनी शाळेत जाऊन घेतली मुख्याध्यापकांची भेट
मुख्याध्यापकांच्या तक्रारीनंतर विद्यार्थिनीचे आई-वडील शाळेत गेले. त्यांनी मुख्याध्यापकांची भेट घेतली. यावेळी संबंधित प्रकरणाबाबत चर्चा झाल्यानंतर आई-वडील आणि मुलगी घरी परतल्याची माहिती आहे. त्यानंतर काही वेळाने विद्यार्थिनीचे आई-वडील न्यायालयात गेले होते. त्यावेळी मुलगी घरीच होती. आई-वडील घराबाहेर गेल्यानंतर विद्यार्थिनीने घरातील पंख्याला गळफास घेतल्याचे समोर आले. कुटुंबीयांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने तिला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
Chandrapur Crime News: रामनगर पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद
या घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी (Ramnagar Police) घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. विद्यार्थिनीने हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणामुळे उचलले, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. शाळेतील घटना, मुख्याध्यापकांनी केलेली तक्रार, त्यानंतर आई-वडिलांची झालेली भेट आणि विद्यार्थिनीची मानसिक अवस्था या सर्व बाबींची चौकशी केली जात आहे. दरम्यान, अवघ्या 14 वर्षांच्या विद्यार्थिनीचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शाळेतील किरकोळ वाटणाऱ्या प्रसंगानंतर घडलेल्या या घटनेमुळे पालक आणि शिक्षकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
Before You Go
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!





















