Kolhapur : बदलापूरनंतर कोल्हापुरातील शियेमध्येही चिमुकल्या मुलीवर अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. शिये येथे 10 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिचा खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे नातेवाईकानेच मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. मुलीच्या आईच्या वहिनीच्या भावानेच (जवळच्या नातेवाईकाने )हे कृत्य केले होते. हा नातेवाईक गेल्या तीन महिन्यांपासून कुटुंबासोबत राहात होता. अवघ्या पाच तासात पोलिसांनी केली गुन्ह्याची उकल केली आणि आरोपीला अटक केली.
शेतात आज दुपारी 10 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती
अत्याचार केल्यानंतर रडल्यामुळे आपले बिंग फुटेल या भीतीने नातेवाईकाने मुलीचा खून केलाय. शेतात आज दुपारी 10 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. अखेर पोलीस तपासात संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय. बदलापूरनंतर कोल्हापुरातील शियेमध्येही चिमुकल्या मुलीवर अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. शिये येथे 10 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिचा खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
राज्यात गेल्या 10 दिवसांत आठ जिल्ह्यांत अल्पवयीन मुलींवरच्या अत्याचाराच्या तब्बल 12 घटना समोर आल्यात. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अकोला, लातूरमध्ये गेल्या काही दिवसांत अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचं समोर आलंय. त्यापैकी 11 घटना या गेल्या तीन दिवसांतल्या आहेत. महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणाऱ्या अशा या घटना आहेत.
बदलापूरातील शाळेत 2 चिमुकल्यांवर अत्याचार
बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत 12 ऑगस्ट रोजी तीन वर्षे आठ महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर 13 ऑगस्ट रोजी पुन्हा सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला.यातील एका मुलीने शारीरिक त्रास होत असल्याचं आपल्या आजोबांना सांगितलं. असाच त्रास मैत्रिणीसोबतही होतोय, असंही या मुलीने सांगितलं. त्यानंतर या मुलीच्या पालकांनी दुसऱ्या मुलीच्या पालकांना संपर्क केला, तर दुसरी मुलगीही शाळेत जाण्यास तयार नसल्याचं त्यांना समजलं. दोन्ही मुलींची वैद्यकीय तपासणी केल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं
इतर महत्वाच्या बातम्या