Jalna Crime: गुप्तधनासाठी 5 वर्षीय मुलीचा बळी द्यायला गेला, भोंदूबाबाने 20 फूट खोल खड्डा केला अन्...जालन्यात संतापजनक प्रकार
पोलिसांनी या भोंदू बाबाला बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव येथून अटक केली आहे .

Jalna Crime: जालना जिल्ह्यात गुप्तधनाच्या लालसेपोटी अवघ्या 5 वर्षीय मुलीचा बळी द्यायला गेलेल्या भोंदू बाबाचा संतापजनक प्रताप उघडकीस आलाय .अंधश्रद्धेच्या विळख्यात नरबळी देण्याचा कट रचणाऱ्या भोंदू बाबाला जालना पोलिसांनी अटक केली आहे . नरबळी देण्याची तयारी सुरू करत त्यासाठी 20 फूट खोल खड्डा घरात खोदल्याचेही पोलीस तपासात उघड झाले .या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे . राज्यात भोंदू बाबांची काही कमी नाही .भस्म अंगार्याच्या पुड्या हातावर ठेवत पैसे कमवण्यासाठी हे कुठल्याही थराला जातील याचा अनुभव जालना जिल्ह्यातून पुढे आलाय . पोलिसांनी या भोंदू बाबाला बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव येथून अटक केली आहे . आत्महत्येनंतर सापडलेल्या चिठ्ठीत लग्न झाल्यावर पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आणि भोकरदन पोलिसांनी बुलढाण्यात जाऊन नरबळीचा हा कट उधळला आहे . (Jalna Crime)
नक्की प्रकार काय ?
भोकरदन तालुक्यातील ज्ञानेश्वर आहेर यांनी 3 मार्चला आत्महत्या केली होती .त्यांच्याकडे मिळालेल्या चिठ्ठीत भोंदू बाबाच्या त्रासाला कंटाळून त्यात आत्महत्या करत असल्याचे समोर आले .या तपासा दरम्यान पोलिसांना ही धक्कादायक माहिती मिळाली .गुप्तधनासाठी एका पाच वर्षे मुलीचा नरबळी देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना आरोपीच्या चौकशीमधून मिळाली .त्यानुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव या गावात छापा टाकून आरोपी राहत असलेल्या घराचे तपासणी केली त्यावेळी घरात वीस फूट खोल खड्डा आढळून आला .याप्रकरणी जालना पोलीस अधिक तपास करत असून या संतापजनक घटनेची कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आयुष निपाणी यांनी दिली आहे .
20 फूट खोल खड्डा नरबळीची तयारी सुरूच होती!
पोलिसांनी भोंदूबाबाच्या हालचालींचा तपास घेतल्यानंतर माहिती मिळाली की, गुप्तधनासाठी एका 5 वर्षीय मुलीचा बळी देण्याची तयारी सुरू होती. या धक्कादायक माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने बुलढाण्यातील धामणगाव येथे छापा टाकला. छाप्यात आरोपीच्या घरात 20 फूट खोल खड्डा आढळून आला, जो नरबळीसाठी तयार केला जात होता, असा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे या भोंदूबाबाच्या जाळ्यात अजून कितीजण आले? या प्रकरणात पोलिस अधिक तपास करत असून, भोंदूबाबाने यापूर्वीही अशा घटना घडवून आणल्या आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली अशा प्रकारे नरबळी देण्याचा प्रकार अतिशय संतापजनक आणि भयानक असून, या भोंदूबाबावर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
हेही पहा























