एक्स्प्लोर

Bhiwandi Crime : चॉकलेटच्या बहाण्याने चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, पोलीसांनी वेषांतर करून बिहारमध्ये जाऊन नराधमाला ठोकल्या बेड्या

Bhiwandi Murder News : चिमुकलीची हत्या केल्यानंतर नराधमाने तिचा मृतदेह बादलीत कोंबून ठेवला आणि बिहारमधील त्याच्या मूळ गावी पळून गेला. 

ठाणे: भिवंडी  शहरात  एका  सहा  वर्षीय  चिमुरडीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने तिच्यावर  अत्याचार  (Bhiwandi Minor Girl Rape case) केला. त्यानंतर   तिची   हत्या  करून (Bhiwandi Murder) मृतदेह प्लास्टिकच्या बादलीत कोंबून  फरार झालेल्या नराधमाला पोलीस पथकाने  फिल्मी स्टाईलने पकडले. बिहारी पद्धतीने वेषांतर करून त्याला बिहार मधील नवाद गावातून बेड्या ठोकल्या आहेत. सलामतअली आलम अन्सारी (वय 32, रा. नवाद,बिहार) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे.

विशेष म्हणजे पोलीस पथक आपल्या मागावर गावात असल्याची कुणकुण नराधमाला लागल्याने त्याने मोबाईल बंद केला होता. त्यानंतर पोलीस पथकाने केंद्र आणि बिहार सरकारच्या योजना राबविण्याचा बहाणा करत तिशी वेशभूषा आणि बिहारी भाषा बोलून गावातील नागरिकांना योजनेच्या लाभाविषयी माहिती देत असतानाच, नराधमही या योजनेचा लाभ घेण्यासाठी येताच वेषांतर केलेल्या पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून अटक केली आहे. 

याप्रकरणी  भिवंडी  शहर  पोलीस ठाण्यात सुरवातीला  अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर  अज्ञात  आरोपी  विरोधात  हत्येचा  गुन्हा दाखल  करून  पोलिसांनी  तपास  सुरू   केला  असता  चिमुरडीच्या  मृतदेहाचा   उत्तरणीय अहवाल  आल्यानंतर  तिच्यावर  अत्याचार  झाल्याने  निष्पन्न  झाले. पोलिसांनी  नरधामाच्या  विरोधात  हत्येसह  अत्याचार  आणि  पोक्सो  कायद्यानुसार  गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपआयुक्त  नवनाथ  ढवळे यांनी दिली आहे.  

चॉकलेट देण्याच्या बहाण्याने अत्याचार 

हत्या  झालेल्या  मृतक  चिमुरडीचे  13  सप्टेंबर  रोजी  आई-वडील  कामासाठी  निघून  गेले  होते. त्यावेळी   सोबत  तिचा  नऊ  वर्षाचा भाऊ घरी होता. त्यातच  चिमुरडी चॉकलेटसाठी परिसरात फिरत असतानाच नराधमाने तिला चॉकलेट घेऊन देण्याच्या बहाण्याने घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिची हत्या करून तिचा मृतदेह बादलीत कोंबून घराला बाहेरून कुलुप लावून फरार झाला होता. दुसरीकडे   चिमुरडी   बेपत्ता  असताना  सायंकाळी  आई  वडील  घरी  आल्यानंतर  मुलाने  बहीण  दिसत  नसल्याची  माहिती  दिली.   त्यानंतर  आई-वडिलांनी  परिसरात  शोध  घेत  रात्री  उशिरा  भिवंडी  शहर  पोलीस  ठाण्यात  मुलीच्या  हरवल्याची  नोंद  केली.  मुलगी  अल्पवयीन  असल्याने  पोलिसांनी  अपहरणाचा  गुन्हा  दाखल करून शोध घेण्यास सुरवात केली.

प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये मृतदेह कोंबून ठेवला 

त्यानुसार  14 सप्टेंबर रोजी   नजीकच्या  वऱ्हाळा  तलावामध्ये   पोलिसांनी  सर्च  ऑपरेशन  घेतले  होते.  परंतु  त्या  ठिकाणी  चिमुरडी  आढळून  आली  नव्हती.  मात्र  15  सप्टेंबर रोजी   दुपारी  परिसरात  दुर्गंधी  येत  असल्याची  माहिती  स्थानिकांनी  पोलिसांना  दिल्यानंतर  भिवंडी  शहर  पोलीस  ठाण्याचे  वरिष्ठ  पोलीस  निरीक्षक  चेतन  काकडे  व  पोलीस  पथक  घटनास्थळी  दाखल  झाले.  त्यांनी  परिसरात  शोध  घेतला  असता  एका  कुलूप  बंद  घर  असलेल्या  चाळीतील  खोली  मध्ये  प्लास्टिकच्या  बकेटमध्ये  मुलीचा  मृतदेह कोंबून ठेवल्याचे आढळून आले होते. 

वेशांतर करून आरोपीला पकडले 

पोलिसांनी  तात्काळ  घटनेचा  पंचनामा  करून  मृतदेह  उत्तरीय  तपासणीसाठी  मुंबई  येथील  जे  जे  रुग्णालयात  रवाना  केला.  भिवंडी  शहर  पोलिस  ठाण्यात  कुटुंबीयांनी  दिलेल्या  तक्रारी  वरून  हत्येचा  गुन्हा  दाखल  केला.  मृतदेह  शवविच्छेदन अहवालामध्ये अत्याचार झाल्याचे समोर आले. त्यानंतर नराधमाच्या घरात पोलीस पथकाने भौतिक तपास करून त्याचे नाव निष्पन्न केले. आणि   आरोपीचा  शोध  घेण्यासाठी  पोलिसांची  तीन  पथके   बिहार राज्यात   रवाना  केली होती. 

विशेष  म्हणजे  हा  नराधम  घटना  घडल्याच्या  दिवसापासून  बेपत्ता  झाला  होता.  शिवाय  गेल्या  दीड  महिन्यापूर्वीच  या  खोलीत  राहत  असल्याचे  पोलीस  तपासात  समोर  आले.  याच  माहितीच्या  आधारे  पोलिसांनी  नराधमाची  ओळख  पटवून  त्याला अटक करण्यासाठी पोलीस पथकाने फिल्मी स्टाईलने वेषांतर करून  बिहार मधील नवाद गावातून त्याला झडप घालून ताब्यात घेतले.  दरम्यान बिहार पोलिसांच्या मदतीने कारवाई करून भिवंडी पोलीस पथकाने 19 सप्टेंबर रोजी नराधमाला भिवंडीत आणून अटक केल्याची माहिती पोलीस उपआयुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.   

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Pune Baramati Crime News: अर्थवला शारीरिक संबंध ठेवायचेत, मला गोळी देतोय; मुलीचा आईला फोन, पुढच्या तासांत युवतीचा मृत्यू, बारामतीमधील हादरवून सोडणारी घटना
अर्थवला शारीरिक संबंध ठेवायचेत, मला गोळी देतोय; मुलीचा आईला फोन, पुढच्या तासांत युवतीचा मृत्यू, बारामतीमधील हादरवून सोडणारी घटना
Pune Crime News: वडापाव खाताना चुकून पायाला पाय लागला, संतापलेल्या वैभवने शिवमच्या छातीवर बुक्क्या मारल्या अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
वडापाव खाताना चुकून पायाला पाय लागला, संतापलेल्या वैभवने शिवमच्या छातीवर बुक्क्या मारल्या अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Embed widget