एक्स्प्लोर

भिवंडी हादरली! अज्ञात महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत सापडला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

याची माहिती तात्काळ पोलीसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा सुरू केला.

Thane Crime: भिवंडी शहर हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इदगाह रोड परिसरातील खाडीत एका अज्ञात महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत सापडला असून  या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इदगाह रोड परिसरातील खाडीत शुक्रवारी सकाळी स्थानिक नागरिकांना पाण्यावर तरंगत असलेली वस्तू दिसली. जवळ जाऊन पाहिल्यानंतर ती वस्तू एका महिलेचे धड नसलेले शिर असल्याचे समोर आले. याची माहिती तात्काळ पोलीसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा सुरू केला.

महिलेची ओळख पटली नाही

या महिलेचे वय साधारण 25 ते 26 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप तिची ओळख पटलेली नाही. तिच्या अंगावरील कपडे अथवा दागिने यामुळेही ओळख पटवणे शक्य झालेले नाही. महिलेच्या शिराला सहविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.महिलेचं शीर नेमकी कुठून आलं? महिलेची हत्या कुठे झाली? मृतदेहाचा उर्वरित भाग कुठे आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. पोलीस विविध अंगांनी तपास करत असून, आसपासच्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या हरवलेल्या महिलांच्या नोंदींची छाननी केली जात आहे. तसेच खाडीजवळील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचाही प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

महिलेचा शिरच्छेद केलेला मृतदेह सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. हा प्रकार ऐकून अनेकांच्या अंगावर शहारे आले. भिवंडी शहरात यापूर्वीही काही वेळा खूनाच्या घटना घडल्या असल्या तरी अशा प्रकारे महिलेचा शिरच्छेद झालेला मृतदेह सापडल्याने लोकांमध्ये भीती व अस्वस्थता पसरली आहे.

पोलिसांची पुढील कार्यवाही

पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, गुन्हे शाखेचे पथकही तपासासाठी घटनास्थळी दाखल झाले आहे. ही हत्या कुणी व कोणत्या कारणासाठी केली याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मात्र आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकांनी जाळे पसरवले आहे.या घटनेमुळे भिवंडी शहरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांचा तपास लागोपाठ सुरू आहे. महिलेची ओळख पटविणे आणि आरोपींना गजाआड करणे हे पोलीसांसमोरील मोठे आव्हान ठरले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Wardha Accident News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाटमध्ये भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक, तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाटमध्ये भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक, तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Embed widget