ठाणे : जिल्ह्यातील भिवंडी शहरात एक ह्रदयद्रावक घटना घडली असून घराचा छत कोसळल्याने झालेल्या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. भिवंडीतील बाहत्तर गाला परीसरात असलेल्या एका चार मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटचा स्लॅब अचानक पडल्याने घरात झोपलेल्या 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. किसन पटेल असं या मृत मुलाचे नाव असून लेकांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आईने टाहो फोडला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, याप्रकरणी घरमालकाने स्लॅबचं काम वेळेत न करुन दिल्यानेच ही घटना घडल्याचंही त्यांनी म्हटलंय.

  


भिवंडीतील बाहत्तर गाला परीसरात असलेल्या इमारतींमधील अनेक फ्लॅटची अवस्था बिकट झाली असून घरात झोपेत असताना अचानक स्लॅब अंगावर पडल्याने दुखापत झाल्याने 15 वर्षीय किसन पटेल हा गंभीर जखमी झाला होता. किसनला कुटुंबीयांनी व स्थानिकांनी तात्काळ जखमी अवस्थेत जवळील शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या संदर्भात भोईवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. या इमारतीमधील घटना घडलेल्या फ्लॅटमध्ये अपघातची ही पहिलीच घटना नाही, याआधी देखील स्लॅब पडल्याने मृत मुलाची आई जखमी झाली होती. तेव्हा इमारतीत दुरुस्ती करण्यासाठी घरमालक भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश टावरे यांच्या हे कुटुंब गेले होते. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केल्याने पुन्हा फ्लॅटमधील स्लॅब पडल्याने एका निष्पाप जीवाचा बळी गेला आहे. 


मुलाच्या आईने घटनेनंतर टाहो फोडताना आर्त हाक दिली, जर वेळेत घरची दुरुस्ती केली असती तर आज माझा मुलगा जिवंत असता, असे आईने म्हटले. आईचे हे शब्द ऐकून उपस्थितांचेही डोळे पाणावले. दरम्यान, या संदर्भात भोईवाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा


Video : आधी हात जोडले, मग डोक्यावर हात; लाडक्या बहिणीला अजित पवार म्हणाले, व्वा गं माझी मैना 


घरासाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; सुलभतेनं अर्ज कसा करावा, यासाठी म्हाडाचा वेबिनार; कुठं पाहता येणार