Jay Shah on Mayank Yadav : भारताचा वेगवान गोलंदाज मयंक यादव सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. या वेगवान गोलंदाजाने आयपीएल 2024 मध्ये केवळ चार सामने खेळले, परंतु त्याने आपल्या वेगाने खळबळ उडवून दिली. मयंकने आयपीएल 2024 मध्ये 6.99 च्या इकॉनॉमीने सात विकेट घेतल्या. मयंक यादवला 150 पेक्षा जास्त वेगाने चेंडू फेकण्यात कोणतीही अडचण येत नव्हती. या काळात त्याने ताशी 156.7 किमी वेगाने चेंडूही टाकला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांना टीम इंडियामध्ये त्याच्या खेळण्याच्या शक्यतांबद्दल विचारले असता ते म्हणाले की, खेळाडूची निवड होईल की नाही याची शाश्वती देऊ शकत नाही.


जय शाह यांना मोहम्मद शमी आणि मयांक यादव यांच्या दुखापतीबाबतच्या अपडेटबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना जय शाह म्हणाले की, "मोहम्मद शमीबद्दल तुमचा प्रश्न बरोबर आहे, पण मी मयंक यादवबद्दल कोणतेही उत्तर देऊ शकत नाही. कारण तो संघात असेल की नाही याची गॅरंटी नाही. पण तो एक चांगला वेगवान गोलंदाज आहे, आणि आम्ही त्याची काळजी घेत आहोत. कारण आम्हाला त्याची ऑस्ट्रेलियात गरज आहे.


आयपीएल 2024 मध्ये युवा वेगवान गोलंदाज मयंकने आयपीएलमध्ये पदार्पण करत सर्वांना प्रभावित केले. परंतु दुखापतीमुळे त्याला केवळ चार सामने खेळल्यानंतर स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. 21 वर्षीय खेळाडूला 2022 च्या लिलावात लखनऊने 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले होते. परंतु त्यानंतर दुखापतीमुळे त्याची जागा अर्पित गुलेरियाने घेतली होती.


मयंकला आयपीएल 2024 मध्ये संधी मिळाली, परंतु दुखापतीमुळे त्याला या हंगामालाही मुकावे लागले. त्याच्या टी-20 कारकिर्दीत त्याने 14 सामन्यात 19 विकेट्स घेतल्या आहेत, तर त्याच्या लिस्ट A कारकिर्दीत मयंकने 17 सामन्यात 34 विकेट घेतल्या आहेत. मयंक डोमेस्टिक सर्किटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व करतो.  


संबंधित बातमी :


MS Dhoni IPL 2025 : मोठा ट्विस्ट! MS धोनीबद्दल आम्ही असे काही बोललोच नाही... CEOचा मोठा खुलासा


Ishan Kishan : शतक ठोकलं तरी फायदा नाही...?; BCCI ने इशान किशनला दिला कडक शब्दात इशारा


MS Dhoni IPL 2025 : 'माही मार रहा है....'', पुन्हा ऐकू येणार हा आवाज! MS धोनीसाठी BCCI आयपीएलमध्ये आणणार नवीन नियम?