एक्स्प्लोर

Bhiwandi : भिवंडीतील बेपत्ता पॉवरलून व्यावसायिकाची हत्या, कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला, तीन लाखांची खंडणी मागितल्याचं उघड

Bhiwandi Crime: भिवंडीतील कारवली गावाजवळील जंगलात कुजलेल्या अवस्थेत या व्यावसायिकाचा मृतदेह मिळाला आहे. आरोपींनी खंडणीची मागणी केली असली तरी या हत्येमागे नेमकं कारण काय आहे त्याचा तपास पोलिस करत आहेत.

ठाणे : भिवंडीतील बेपत्ता असलेले पॉवरलूम व्यावसायिक फरहत अखलाक शेख (वय 54) यांची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेख यांचा मृतदेह कारवली गावाजवळील जंगलात कुजलेल्या अवस्थेत सापडला. आरोपीने शेख यांच्या व्हॉट्सअॅपवरुन कुटुंबीयांकडून तीन लाखांची खंडणीही मागितल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरू आहे. 

भिवंडी शहरातील गैबी नगर परिसरात राहणाऱ्या पावरलूम व्यवसायिक फरहत अखलाक शेख 12 एप्रिल, शनिवार रोजी घरी न आल्याने घरच्यांनी शोध घेतला. मात्र मोबाईल स्विच ऑफ येत असल्याने कुटुंबीयांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत मिसिंग रिपोर्ट दाखल केली. शांतीनगर पोलिस मिसिंग रिपोर्टच्या आधारे तपास घेत असतानाच कुटुंबीयांना मयताच्या व्हाट्सअपवरुन एक मेसेज आला आणि तीन लाख रुपयांची मागणी करण्यात आली. 

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला

शनिवारी सकाळपासून बेपत्ता असलेला फरहत शेख यांचा मृतदेह भिवंडी पोलिसांना कारिवली गावच्या जंगलात मिळाला. हा मृतदेह चार दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी भोईवाडा पोलिस दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून शवविच्छेदनासाठी तो भिवंडी येथील शासकीय रुग्णालयात पाठवला .

सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती  

फरहत शेख हे मूळचे उत्तर प्रदेशातील आजमगढ़ येथील रहिवासी असून ते भिवंडीतील गैबीनगर परिसरात पत्नी व चार मुलींसह राहत होते. ते पॉवरलूम व्यवसाय आणि बिल्डरचे काम करायचे. फरहत शेख हे आपल्या स्कूटरवरुन एका पिवळा शर्ट घातलेल्या तरुणासोबत कारिवली गावाच्या दिशेने गेले होते असं पोलिस तपासामध्ये समोर आलं. त्याचा सीसीटीव्हीही पोलिसांच्या हाती लागला.

व्हॉट्सअॅपवरुन मेसेज, लोकेशन बदलले 

दरम्यान, फरहत शेख यांचे मोबाईल सिम दुसऱ्या फोनमध्ये टाकून व्हॉट्सअ‍ॅपवरून मेसेज केले जात होते. सुरुवातीला त्यांचा अपघात झाल्याचे सांगितले गेले. नंतर 80 हजार रुपयांची मागणी झाली. ही रक्कम नंतर तीन लाखांपर्यंत गेली. सर्व चर्चा ही मेसेज स्वरूपात झाली आणि पैशाची मागणी करण्यात आली. पुण्याच्या पिंपरी चिंचवड भागातील झोपडपट्टीत तो मोबाईल वापरला जात असल्याचा सुगावा पोलिसांना लागल. पोलिस तिथे पोहोचले, मात्र आरोपी सतत लोकेशन बदलून पोलिसांना चकवा देत आहे.

शेवटी चार दिवसांच्या शोध मोहिमेनंतर फरहत शेख यांचा मृतदेह कारिवली गावच्या जंगलात कुजलेल्या अवस्थेत सापडला. पोलिस या संपूर्ण घटनेचा तपास करत असून आरोपीचा कसून शोध सुरू केला आहे.  या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
Crime News : आधी बँकेच्या बाहेर पत्नीला गोळ्या घातल्या, मग बहिणीला मारलं, शेवटी स्वतःचं जीवनही संपवलं; कौटुंबिक वादातून 3 जणांचा अंत
आधी बँकेच्या बाहेर पत्नीला गोळ्या घातल्या, मग बहिणीला मारलं, शेवटी स्वतःचं जीवनही संपवलं; कौटुंबिक वादातून 3 जणांचा अंत
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन

Embed widget