एक्स्प्लोर

Bhandara : भंडाऱ्यात डॉक्टरकडून कर्मचाऱ्याला अमानुष मारहाण; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप, ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

Bhandara Doctor News : भंडाऱ्यात एक डॉक्टर कर्मचाऱ्याला अमानुष मारहाण करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या डॉक्टरविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Bhandara Doctor News : भंडाऱ्यात एक डॉक्टर कर्मचाऱ्याला अमानुष मारहाण करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रातली ही घटना आहे. डॉक्टर कडस्कार असं मारहाण करणाऱ्या डॉक्टरांचं नाव असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान या घटनेनंतर आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असून डॉक्टरांविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच या डॉक्टरविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर कडस्कार यांनी आपल्याच कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा मारहाणीचा व्हिडीओ  सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Video Viral) झाला असून पोलिसांनी डॉक्टरविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

डॉक्टर सागर कडस्कर यांनी रुग्णलयातील शिपाई पदावर असेलल्या नारायण उइके यांना काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. ही घटना 22 मार्चची आहे. हा सर्व प्रकार एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

डॉक्टर सागर कडस्कर यांच्या म्हणण्यानुसार शिपाई नारायण उइके हा रुग्णालयात रोज दारू पिऊन येत असल्यामुळे आपण त्यांना मारहाण केली.  मात्र डॉक्टरांनी आपल्या कर्मचाऱ्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्याऐवजी कायदा हातात घेत कर्मचाऱ्यांला मारहाण केल्यानं संताप व्यक्त केला जात आहे.  

उइके यांना मारहाण झाल्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आदिवासी संघटना डॉक्टर विरोधात एकवटल्या आहे. तसेच डॉक्टर विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला असून कायदेशीर कारवाई केली जावी अशी मागणी करण्यात येत आहे. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Protest Video Viral: मुंबईतील आंदोलनात सिव्हील ड्रेसमधील पोलिसाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा विरोधकांचा आरोप; दादरमधील व्हिडीओ व्हायरल
मुंबईतील आंदोलनात सिव्हील ड्रेसमधील पोलिसाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा विरोधकांचा आरोप; दादरमधील व्हिडीओ व्हायरल
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
Raja Raghuvanshi Case: सोनम रघुवंशीचा जामीन रद्द; तीन आठवड्यांत सरेंडर करण्याचे आदेश, सुप्रीम कोर्ट म्हणाले, 'आरोपी जामिनास...'
सोनम रघुवंशीचा जामीन रद्द; तीन आठवड्यांत सरेंडर करण्याचे आदेश, सुप्रीम कोर्ट म्हणाले, 'आरोपी जामिनास...'
Police Threats Students : खिशात अमली पदार्थ ठेवून आत टाकण्याची भाषा; त्याच पोलिसाला गृहखात्याचा मोठा दणका, विद्यार्थ्याला धमकी देणाऱ्या पोलिसाची बदली
खिशात अमली पदार्थ ठेवून आत टाकण्याची भाषा; त्याच पोलिसाला गृहखात्याचा मोठा दणका, विद्यार्थ्याला धमकी देणाऱ्या पोलिसाची बदली

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Protest Marathi News: सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!
सोनम वांगचुक यांनी जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण सोडलं; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, सगळं स्पष्ट करुन टाकलं!
Rahul Gandhi on PM Modi: 'मिस्टर मोदी सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका, माफी मागा'; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल
'मिस्टर मोदी सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका, माफी मागा'; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर कडाडून हल्लाबोल
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget