BARC Scientist Suicide: भाभा अणुसंशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञाची आत्महत्या; घरात आढळला मृतदेह
Mumbai Crime News: ट्रॉम्बे येथील BARC मधील 50 वर्षीय शास्त्रज्ञानं सोमवारी राहत्या घरी आत्महत्या केली आहे.
BARC Scientist Suicide: चांद्रयान मोहिमेच्या यशाबद्दल संपूर्ण देश शास्त्रज्ञांचं कौतुक करतोय. पण दुसरीकडे मुंबईत मात्र एका शास्त्रज्ञानं स्वतःचं आयुष्य संपवलंय. मुंबईतील अणुशक्ती नगर येथील भाभा अणुसंशोधन केंद्रात (BARC) काम करणाऱ्या 50 वर्षीय शास्त्रज्ञानं गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ट्रॉम्बे पोलिसांनी ही माहिती दिली आहे. मनीष शर्मा असं मृत्यू झालेल्या शास्त्रज्ञाचं नाव असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या शास्त्रज्ञांनी घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.
मुंबईतल्या भाभा अणूसंशोधन केंद्र म्हणजेच, Bhabha Atomic Research Centre मधील 50 वर्षीय शास्त्रज्ञाने सोमवारी राहत्या घरी आत्महत्या केली. मनीष सोमनाथ शर्मा असं मृत शास्त्रज्ञांचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष यांनी सोमवारी दुपारी 3 च्या दरम्यान आत्महत्या केली. पत्नीनं शेजारी राहणाऱ्यांच्या मदतीनं मनीष शर्मा यांना BARC रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं? याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही.
पोलिसांनी सांगितलं की, शास्त्रज्ञ मनीष शर्मा यांच्या घरातून एक सुसाईड नोट मिळाली आहे. पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी एडीआर नोंदवला आहे. शर्मा मानसिक तणावाखाली असल्याचं सांगण्यात येत आहे.
नेमकं काय घडलं?
ट्रॉम्बे येथील BARC मधील 50 वर्षीय शास्त्रज्ञाने सोमवारी राहत्या घरी आत्महत्या केली. मृत शास्त्रज्ञाचं नाव मनीष सोमनाथ शर्मा असं आहे. ते 50 वर्षांचे असून आपल्या पत्नी समवेत ते ट्रॉम्बे येथे राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सोमवारी दुपारी 3 च्या दरम्यान आत्महत्या केली. शर्मा यांनी राहत्या घरात नायलॉनच्या दोरीच्या साहाय्यानं पंख्याला लटकून गळफास घेतला. पत्नीनं आजूबाजूच्या लोकांच्या मदतीनं ॲम्बुलन्सनं बीआरसी हॉस्पिटलमध्ये त्यांना नेलं, पण त्यापूर्वीच मनीष यांचा मृत्यू झाला होता. मनीष शर्मा यांनी टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत मात्र अद्याप कोणतीच माहिती मिळालेली नाही. मात्र ट्रॉम्बे पोलिसांनी या प्रकरणात ADR दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.