एक्स्प्लोर

Nagpur Crime : कर्जात बुडाल्याने केला लुटण्याचा बनाव , नोकरच निघाला चोर

नोकरने स्वतःला तीन युवकांनी लुटल्याचा बनाव करीत, 20 लाख रुपये मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याबाबत कुठलेही सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज न मिळाल्याने तो गुन्हे शाखेच्या तपासात अडकला.

नागपूरः भरदुपारी तिघांनी युवकाकडून वीस लाख रुपये असलेली बॅग हिसकाविल्याची घटना गुरुवारी चिखली उड्डानपुलावर घडल्याची माहिती समोर आली होती. मात्र, याप्रकरणी कर्जात बुडाला असल्याने खुद्द नोकरानेच पैसे चोरल्याचा बनाव केल्याची माहिती समोर आली आहे. युनिट 5 चे पोलिस निरीक्षक महेश साळुंके यांच्या पथकाने युवकाला अटक करीत यशोधरानगर पोलिसांच्या ताब्यात दिले.

असा केला बनाव

जरिपटका राहणारे मोहन साजवानी या मिरची व्यावसायिकाकडे सिद्धार्थ पुरुषोत्तम रामटेके (वय 27, रा.जुनी मंगळवारी) काम करतो. बुधवारी त्याने मालकाकडून 20 लाख रुपये घेतले. ते कळमना येथील व्यापाऱ्याकडे नेण्यासाठी आपल्या ॲक्टिव्हावरुन यशोधरानगर पोलिस ठाण्यांतर्गत चिखली उड्डाणपूल परिसरात दुपारी 3 वाजताच्या सुमारास जात असताना, अचानक पाऊस येत असल्याने रेनकोट घालण्यासाठी थांबला. तेव्हाच अचानक तीन युवकांनी त्याच्या डोक्यावर वार केला. हेल्मेट असल्याने तो दचकला यादरम्यान तिघेही समोर ठेवलेली बॅग हिसकावून पळून गेले. दरम्यान या प्रकाराची माहिती त्याने मालक मोहन साजवानी यांना दिली. त्यांनी यशोधरानगर ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान या प्रकरणाचा तपास करीत असताना, गुन्हे शाखेच्या पथकाला युवकावर संशय आला. त्यांनी सिद्धार्थला ताब्यात घेत, त्याची विचारणा केली असता, त्यानेच पैशाच्या गरजेपोटी बॅग लुटल्याचा बनाव केल्याची कबूली दिली. दरम्यान पथकाने त्याला अटक करीत, पैसेही ताब्यात घेतले. यावेळी त्याला यशोधरानगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. 

टाळेबंदीमुळे होता कर्जात 

सिद्धार्थचे रमना मारोती परिसरात इलेक्ट्रीकचे दुकान आहे. मात्र, पहिल्या आणि दुसऱ्या टाळेबंदीमुळे त्याचे दुकान बंद झाल्याने तो कर्जबाजारी झाला. दरम्यान त्याने ज्यांना सामान दिले, त्यांचाही मृत्यू झाल्याने थकीत रक्कम बुडाली. त्यातून तो बऱ्याच प्रमाणात कर्जात बुडाला. त्यामुळे त्याला पैशाची चणचण भासू लागली. यातून त्याने ही योजना तयार करीत, स्वतःला तीन युवकांनी लुटल्याचा बनाव करीत, 20 लाख रुपये मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याबाबत कुठलेही सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज न मिळाल्याने तो गुन्हे शाखेच्या तपासात अडकला.

महत्त्वाच्या बातम्या

मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
Mira Bhayandar Crime News: मध्यरात्री शिकारीसाठी जंगलात शिरले; काहीच सापडलं नाही, परताताना डोळे चमकले अन्..., गोळीबारात ग्रुपमधील एकाचा मृत्यू, मृतदेहावर पहाटेच उरकले अंत्यसंस्कार
मध्यरात्री शिकारीसाठी जंगलात शिरले; काहीच सापडलं नाही, परताताना डोळे चमकले अन्..., गोळीबारात ग्रुपमधील एकाचा मृत्यू, मृतदेहावर पहाटेच उरकले अंत्यसंस्कार
Bhandara Food Poisoning : दुर्गोत्सवाच्या जेवणातून 300 लोकांना विषबाधा; भंडाऱ्याच्या खराशी गावातील खळबळजनक प्रकार
दुर्गोत्सवाच्या जेवणातून 300 लोकांना विषबाधा; भंडाऱ्याच्या खराशी गावातील खळबळजनक प्रकार
Jitendra Awhad Pune Crime : सिक्युरिटी सुपरवायझर; पुण्यात भाड्याच्या घरात वास्तव्य, जितेंद्र आव्हाडांना मारण्याची धमकी, मालकानं टीव्ही पाहिल्यानंतर पोलिस ठाण्यात नेलं अन्...
सिक्युरिटी सुपरवायझर; पुण्यात भाड्याच्या घरात वास्तव्य, जितेंद्र आव्हाडांना मारण्याची धमकी, मालकानं टीव्ही पाहिल्यानंतर पोलिस ठाण्यात नेलं अन्...

व्हिडीओ

Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, तब्बल 56 वर्षानंतर ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, नेमकं काय घडलं?
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
South Star Yash On Sai Pallavi In Ramayana: 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
Supriya Sule : पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून भाजप उमेदवारांना मतदान करण्यासाठी फोन, ऑडिओ क्लिप शेअर करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी
भाजप उमेदवारांना मतदान करा, पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून मतदारांना फोन, सुप्रिया सुळेंकडून ऑडिओ क्लिप शेअर
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
Embed widget