एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil : विलास घुले प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालावं, परळीकरांचे ऐकून खोटे आरोप करू नयेत; मनोज जरांगे पाटलांची मागणी

Manoj Jarange Patil : महिलेने केलेल्या आरोपानंतर केजमधील विलास घुले हत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. या प्रकरणात एसआयटीने मुळाशी जाऊन तपास करावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 

Manoj Jarange Patil : बीड जिल्ह्यातील टाकळी गावातील विलास घुले हत्या प्रकरणामुळे (Vilas Ghule Case) सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत महत्त्वाची आणि आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. विलास घुले हत्या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने (SIT) केवळ वरवरचा तपास न करता या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाणे गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

घुले कुटुंबावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही, असा ठाम विश्वास जरांगे पाटील यांनी दिला. घुले प्रकरणाशी संबंधित एका महिलेने माध्यमांसमोर येऊन अत्यंत खळबळजनक दावे आणि आरोप केले होते. या सर्व घडामोडींनंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना ही महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.  

Beed Crime Investigation : एसआयटी एकतर्फी काम करू शकत नाही

मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच्या एका प्रकरणाचा दाखला देत पोलिसांच्या आणि एसआयटीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, "यापूर्वी महादेव मुंडे प्रकरणात देखील एसआयटी स्थापन करण्यात आली होती. मात्र तिथे केवळ थातूरमातूर तपास झाला. या घुले हत्येच्या प्रकरणात एसआयटीला एकतर्फी काम करता येणार नाही. जर या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा दोषी असेल तर सत्य काय आहे ते समोर येईलच. कायद्यानुसार जी कारवाई व्हायची ती होईल."

Manoj Jarange Patil Vs Dhananjay Munde : परळीवाल्यांचे ऐकून खोटे आरोप करू नका

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे जोरदार निशाणा साधला. आम्ही परळीवाल्यांसारखे आरोपी लपवत नाही. त्यांनी खून करूनही तो केला नाही असं म्हटलं. पण तशी नियत आमची नाही. आम्ही मराठे कधीही असं वागत नाही, असा टोला त्यांनी लगावला. 

घुले कुटुंबाला जर आमची मदत लागली तर आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. पण परळीवाल्यांचे ऐकून तुम्ही कोणावरही खोटे आरोप करू नका, असं जरांगे म्हणाले. 

Vilas Ghule Umesh Mane : उमेश मानेवर महिलेचे आरोप

दरम्यान, या प्रकरणात ज्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्या उमेश मानेवर एका महिलेने आरोप केले आहेत. उमेश मानेने आपले आक्षेपार्ह व्हिडीओ काढून ब्लॅकमेल केले, शारीरिक संबंध ठेवले नाहीत तर नवरा आणि मुलांना मारून टाकू अशी धमकी दिल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. उमेश माने हा मयत विलास घुलेचा मित्र असून त्याला मारण्यासाठी आलेल्या लोकांनी मध्ये आलेल्या विलास घुलेला मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. 

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

FDA Actions News: तुकाराम मुंढेंच्या FDAचा भेसळखोरांना दणका; दिवाळीपूर्वी छत्रपती संभाजीनगर, जाधववाडी मोंढ्यासह पंढरपूरच्या चार मोठ्या कंपन्यांवर छापा, लाखोंचा माल जप्त
तुकाराम मुंढेंच्या FDAचा भेसळखोरांना दणका; दिवाळीपूर्वी छत्रपती संभाजीनगर, जाधववाडी मोंढ्यासह पंढरपूरच्या चार मोठ्या कंपन्यांवर छापा, लाखोंचा माल जप्त
Nagpur Crime: नागपूर विमानतळावर रिक्षाचालक अन् महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानामध्ये वाद; शिवीगाळ करत हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल, वरिष्ठ अधिकाऱ्याची सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार
नागपूर विमानतळावर रिक्षाचालक अन् महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानामध्ये वाद; शिवीगाळ करत हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल, वरिष्ठ अधिकाऱ्याची सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार
Pune Crime news: पुण्याचा 'युपी-बिहार' झाला, रस्त्यात सर्वांदेखत नराधमाचं तरुणीसोबत नको ते कृत्य, उचलून नेण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
पुण्याचा 'युपी-बिहार' झाला, रस्त्यात सर्वांदेखत नराधमाचं तरुणीसोबत नको ते कृत्य, उचलून नेण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
Dhule Crime : धुळ्यात भयंकर घटना! साक्रीत पतीने पत्नी अन् तीन वर्षांच्या मुलाला दगडाने ठेचून मारले; स्वतःवरही केला जीवघेणा हल्ला
धुळ्यात भयंकर घटना! साक्रीत पतीने पत्नी अन् तीन वर्षांच्या मुलाला दगडाने ठेचून मारले; स्वतःवरही केला जीवघेणा हल्ला

व्हिडीओ

NCP Finance Ministry : अर्थखातं राष्ट्रवादी मिळणार? मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली?Special Report
Vivek Padit Majha Katta : आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे विवेक पंडित माझा कट्ट्यावर
Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha
Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil and Sanjay Raut: संजय राऊतांनी ऑडिओ क्लीपचा मुद्दा डायरेक्ट राष्ट्रीय पातळीवर नेला, अमित शाहांना पत्र, 500 कोटींची ईडी चौकशी करण्याची मागणी
संजय राऊतांनी ऑडिओ क्लीपचा मुद्दा डायरेक्ट राष्ट्रीय पातळीवर नेला, अमित शाहांना पत्र, 500 कोटींची ईडी चौकशी करण्याची मागणी
FDA Actions News: तुकाराम मुंढेंच्या FDAचा भेसळखोरांना दणका; दिवाळीपूर्वी छत्रपती संभाजीनगर, जाधववाडी मोंढ्यासह पंढरपूरच्या चार मोठ्या कंपन्यांवर छापा, लाखोंचा माल जप्त
तुकाराम मुंढेंच्या FDAचा भेसळखोरांना दणका; दिवाळीपूर्वी छत्रपती संभाजीनगर, जाधववाडी मोंढ्यासह पंढरपूरच्या चार मोठ्या कंपन्यांवर छापा, लाखोंचा माल जप्त
Sachin Pilgaonkar Ashi Hi BanwaBanwi: 'मला ओळखलंत का सासूबाई?'; 'अशी ही बनवाबनवी'च्या सेटवर सचिन पिळगावकर साडी नेसून सुप्रिया पिळगावकरांच्या आईला भेटले, अन् मग...
'मला ओळखलंत का सासूबाई?'; 'अशी ही बनवाबनवी'च्या सेटवर सचिन पिळगावकर साडी नेसून सुप्रिया पिळगावकरांच्या आईला भेटले, अन् मग...
Devdutt Padikkal NZ vs IND : 199 वर देवदत्त पडिक्कल OUT की NOT OUT?, भारत आणि न्यूझीलंड सामन्यात पंचांचा वादग्रस्त निर्णय, सगळेच चक्रावले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
199 वर देवदत्त पडिक्कल OUT की NOT OUT?, भारत आणि न्यूझीलंड सामन्यात पंचांचा वादग्रस्त निर्णय, सगळेच चक्रावले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Tiger Shroff Aamir Khan Target: टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात हादरवणारी माहिती समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं पहिलं टार्गेट कोण, प्लॅन का बदलला?
टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात हादरवणारी माहिती समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं पहिलं टार्गेट कोण, प्लॅन का बदलला?
Nagpur Crime: नागपूर विमानतळावर रिक्षाचालक अन् महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानामध्ये वाद; शिवीगाळ करत हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल, वरिष्ठ अधिकाऱ्याची सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार
नागपूर विमानतळावर रिक्षाचालक अन् महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानामध्ये वाद; शिवीगाळ करत हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल, वरिष्ठ अधिकाऱ्याची सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार
Govinda on Marriage: 'त्या लोकांना माझ्या बुटाने जोरात मारेन'; गोविंदाचा संताप अन् थेट इशारा, आपल्या वैवाहिक जीवनावर असं का म्हणाला अभिनेता?
'त्या लोकांना माझ्या बुटाने जोरात मारेन'; गोविंदाचा संताप अन् थेट इशारा, आपल्या वैवाहिक जीवनावर असं का म्हणाला अभिनेता?
Pune Crime news: पुण्याचा 'युपी-बिहार' झाला, रस्त्यात सर्वांदेखत नराधमाचं तरुणीसोबत नको ते कृत्य, उचलून नेण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
पुण्याचा 'युपी-बिहार' झाला, रस्त्यात सर्वांदेखत नराधमाचं तरुणीसोबत नको ते कृत्य, उचलून नेण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
Embed widget