एक्स्प्लोर

कीर्तनात बसलेल्या पत्नीवर पतीची दगडफेक आणि तलवारबाजी, बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना

तू कुणाला विचारुन किर्तनाला आली आहेस असं म्हणत पतीने आपल्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जमलेल्या लोकांवर दगडफेकही केली. 

बीड : पत्नी कीर्तन ऐकण्यात दंग असताना अचानक तिथे पतीची एन्ट्री झाली आणि संतप्त पतीने तिच्यावर थेट दगडफेक करायला सुरुवात केली. एवढेच नाही तर हातातील तलवारीने पत्नीला मारहाण करायला सुरुवात केली. परळी तालुक्यातील मालेवाडीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

मालेवाडीमध्ये गावातील मारुतीच्या मंदिरामध्ये हभप अर्जुन महाराज लाड यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होता. हे किर्तन ऐकायला माणिक बदने या व्यक्तीची पत्नी बसली होती. गावातील बरीच वृद्ध मंडळी कीर्तन ऐकण्यात दंग होती. याच वेळी माणिक बदने तिथे अवतरला ते थेट हातामध्ये तलवारीसारखे शस्त्र घेऊन. सुरुवातीला माणिक बदने याने आपल्या पत्नीला मोठमोठ्याने शिव्या द्यायला सुरुवात केली आणि चालू कीर्तनात मिठाचा खडा पडला.

तू कुणाला विचारुन किर्तनाला आली आहेस असे म्हणत माणिक बदने याने आपल्या पत्नीला मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी भांडण सोडावण्याचा प्रयत्न केला. मात्र माणिक बदने यांनी भांडण सोडवण्यास आलेल्या व्यक्तीलाच मारहाण केली. माणिक बदणे एवढ्यावरच थांबला नाही तर आजूबाजूचे दगड हातात हे त्याने चक्क दगडफेक करायला सुरुवात केली.

या दगडफेकीत आणि मारहाणीमध्ये भांडण सोडवायला आलेले चार जण जखमी झालेत. भर कीर्तनात पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत माणिक बदने याने अक्षरशः नंगानाच चालवला. याप्रकरणी या पीडित महिलेनेच पत्नीविरुद्ध फिर्याद दाखल केली असून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shubhanshu Shukla :  कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना अशोक चक्र जाहीर, आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रातील कामगिरीचा सन्मान  
शुभांशू शुक्ला यांना अशोक चक्र जाहीर,आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रातील कामगिरीचा सन्मान  
मुंबईत 81 वर्षांपूर्वी महाभायनक आग आटोक्यात आणणारे अग्निशमन वाहन; BMC कडून ‘टर्न टेबल शिडी’चे पुनर्जतन

जळगावात भीषण अपघातात आजोबासह नातवाचा मृत्यू, आजी गंभीर जखमी; कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जानेवारी 2025 | रविवार

व्हिडीओ

Padma Awards 2026 : अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार
Bhiwandi Banner News : भिवंडीत वेगळ्या समीकरणाची नांदी? सेनेच्या बॅनरवर शरद पवारांच्या खासदाराचा फोटो
मोठी बातमी: मालाड रेल्वे स्थानकात पोटात चाकू भोसकून प्राध्यापकाला संपवणारा ओंकार शिंदे सापडला
Padma Award 2026 : 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा, रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड, भिकल्या लाडक्या धिंडा यांना पद्म पुरस्कार जाहीर
Ajit Pawar Baramati : भर सभेत अजित पवार पदाधिकाऱ्यांवर भडकले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shubhanshu Shukla :  कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना अशोक चक्र जाहीर, आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रातील कामगिरीचा सन्मान  
शुभांशू शुक्ला यांना अशोक चक्र जाहीर,आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रातील कामगिरीचा सन्मान  
मुंबईत 81 वर्षांपूर्वी महाभायनक आग आटोक्यात आणणारे अग्निशमन वाहन; BMC कडून ‘टर्न टेबल शिडी’चे पुनर्जतन
मुंबईत 81 वर्षांपूर्वी महाभायनक आग आटोक्यात आणणारे अग्निशमन वाहन; BMC कडून ‘टर्न टेबल शिडी’चे पुनर्जतन
जळगावात भीषण अपघातात आजोबासह नातवाचा मृत्यू, आजी गंभीर जखमी; कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश
जळगावात भीषण अपघातात आजोबासह नातवाचा मृत्यू, आजी गंभीर जखमी; कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जानेवारी 2025 | रविवार
तामिळनाडूत हिंदीला स्थान नाही, आम्ही नेहमीच सक्तीला विरोध करू, तामिळवरील आमचं प्रेम कधीच मरणार नाही; सीएम स्टॅलिन यांचा एल्गार

तारपा वाजवत आनंदी आनंद.. पद्मश्री जाहीर होताच संगीतकार भिकल्या धिंडा म्हणाले, मोबाईलच्या युगात संस्कृती जपतोय

सामूदायिक विवाह सोहळा आटोपून परत येताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; कोल्हापूरच्या उद्योजक दाम्पत्याचा करुण अंत, अवघ्या आठ महिन्यांची पोटची चिमुरडी लेक बचावली

बिहार निवडणुकीत दारुण पराभव, घरात अभूतपूर्व 'रामायण' तरीही तेजस्वी यादवांना राजदमध्ये मोठी जबाबदारी; बहिण रोहिणीनं पुन्हा तोफ डागली

Embed widget