एक्स्प्लोर

Beed Land Scam : बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 310 कोटींच्या भूसंपादन घोटाळ्यात कारवाई 

Avinash Pathak : मुख्य दलाल आणि इतर आरोपींसोबत झालेल्या संभाषणांची पडताळणी करण्यासाठी अविनाश पाठक यांचे आवाजाचे नमुने घेण्यात आले आहेत.

Beed Land Acquisition Scam : बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन आणि वाढीव मावेजा प्रकरणातील कथित 310 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात अटक करण्यात आलेले बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. सात दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.

मागील सात दिवसांत विशेष तपास पथकाने (SIT) अविनाश पाठक यांची कसून चौकशी केली. या चौकशीत अनेक महत्त्वाच्या आणि धक्कादायक बाबी समोर आल्याची माहिती तपास यंत्रणांनी न्यायालयात दिली.

Beed Land Scam SIT Investigation : तपासात धक्कादायक बाबी समोर

या घोटाळ्याशी संबंधित 154 प्रकरणांपैकी सहा अत्यंत महत्त्वाच्या मूळ फाईल्स कार्यालयातून गायब असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. तसेच बदली झाल्यानंतरही पाठक यांच्या शासकीय संगणकाचा वापर करून मागील तारखांचे नुकसानभरपाई आदेश तयार करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या संदर्भातील लॅपटॉप आणि इतर डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले असून त्यांचा सखोल तपास सुरू आहे.

Avinash Pathak Voice Sample Evidence : आवाजाचे नमुने फॉरेन्सिककडे

मुख्य दलाल आणि इतर आरोपींसोबत झालेल्या संभाषणांची पडताळणी करण्यासाठी अविनाश पाठक यांचे आवाजाचे नमुने घेण्यात आले आहेत. हे नमुने फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे तपासासाठी पाठवण्यात आले आहेत.

Beed Court Proceedings : न्यायालयात नेमके काय घडले?

पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर बीड पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात अविनाश पाठक यांना विशेष न्यायालयात हजर केले. पोलिसांनी तपासाचा प्रगती अहवाल न्यायालयासमोर सादर केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पोलीस कोठडीऐवजी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली.

न्यायालयीन कोठडीमुळे अविनाश पाठक यांना जिल्हा कारागृहात पाठवण्यात आले. दरम्यान, त्यांच्या वकिलांकडून नियमित जामिनासाठी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू आहे.

What Is Beed Land Scam : नेमकं प्रकरण काय आहे?

बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी करण्यात आलेल्या भूसंपादन प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या कथित बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करून मागील तारखांचे आदेश तयार करण्यात आले आणि 154 प्रकरणांमध्ये तब्बल 241 कोटी 62 लाख रुपयांचा वाढीव मोबदला मंजूर करण्यात आला.

यापैकी अंदाजे 73 कोटी 4 लाख रुपये संबंधित खातेदारांना वितरित करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रक्रियेत आवश्यक रजिस्टर आणि नोंदी ठेवण्यात न आल्याचेही उघड झाले आहे.

Beed Corruption Case : आणखी अधिकारी अडकण्याची शक्यता

या घोटाळ्याची पाळेमुळे महसूल विभागातील आणखी कोणत्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली आहेत, याचा तपास SIT करत आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
मनोज जरांगेंच्या विरोधात बोलतो म्हणून मला मारहाण; अमोल खुणे मारहाप्रकरणी 6 अज्ञातांवर गुन्हा; आरोप फरार, पोलीस पथके रवाना
मनोज जरांगेंच्या विरोधात बोलतो म्हणून मला मारहाण; अमोल खुणे मारहाप्रकरणी 6 अज्ञातांवर गुन्हा; आरोप फरार, पोलीस पथके रवाना
नवरीचा अनोखा प्रताप, पैसे आणि दागिने घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न, सासू सासऱ्यासोबत केलं धक्कादायक कृत्य
नवरीचा अनोखा प्रताप, पैसे आणि दागिने घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न, सासू सासऱ्यासोबत केलं धक्कादायक कृत्य
Kolhapur Crime News: सियापेक्षा डेंजर निघाला 'तो', शेवटी प्रेमालाही संपवलं, पोलिसांना सांगितली चक्रावून टाकणारी स्टोरी, एका चुकीने गेम ओव्हर, चॅटमधून धक्कादायक माहिती समोर
सियापेक्षा डेंजर निघाला 'तो', शेवटी प्रेमालाही संपवलं, पोलिसांना सांगितली चक्रावून टाकणारी स्टोरी, एका चुकीने गेम ओव्हर, चॅटमधून धक्कादायक माहिती समोर

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget