एक्स्प्लोर

Beed Crime: साक्षीदारांची फेरपडताळणी आणि व्हॉइस सॅम्पल! भूसंपादन घोटाळ्यात बीडचे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठकांच्या अडचणीत वाढ?

Beed Crime: बीडमधील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन घोटाळा प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेले माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले आहेत.

Beed Crime: राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन घोटाळा प्रकरणातील तपास अधिक तीव्र झाला असून, पोलिसांच्या ताब्यात असलेल्या बीडचे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक (Avinash Pathak) यांच्या आवाजाचे नमुने तपास यंत्रणेने घेतले आहेत. या प्रकरणात आज त्यांची पोलीस कोठडी संपत असून दुपारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तपासासाठी आणखी वेळ आवश्यक असल्याचे कारण देत पोलिसांकडून त्यांच्या वाढीव कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या प्रकरणातील भूसंपादन समन्वय शाखेतील डाटा एन्ट्री ऑपरेटर अविनाश चव्हाण याला अटकपूर्व जामीन मंजूर झाला असून त्याचा जबाबही पोलिसांनी नोंदवला आहे. तपासादरम्यान समोर येणाऱ्या नव्या मुद्द्यांच्या आधारे यापूर्वी जबाब नोंदवलेल्या मुख्य साक्षीदारांची फेर पडताळणीही सुरू करण्यात आली आहे.

Beed Crime: नेमकं प्रकरण काय?

बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी करण्यात आलेल्या भूसंपादन प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणारा मावेजा वाढवून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांचा वापर करून बनावट आदेश तयार करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणामुळे शासनाची तब्बल 73 कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात यापूर्वीच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे.

Beed Crime:  67 कोटींचा मोबदला थेट 310 कोटींवर

तपास यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2025 दरम्यान तब्बल 154 वाढीव मावेजा आदेश काढण्यात आले. सुरुवातीला 67 कोटी रुपयांचा असलेला मूळ मोबदला वाढवून तो तब्बल 310 कोटी रुपयांपर्यंत नेण्यात आला. यात 241 कोटी 62 लाख रुपयांचा वाढीव मोबदला मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी सुमारे 73 कोटी 4 लाख रुपये संबंधित खातेदारांना वितरितही करण्यात आले. विशेष म्हणजे, संबंधित आदेश जारी करताना आवश्यक असलेली रजिस्टर नोंद, दस्तऐवज किंवा अधिकृत नोंदवही भूसंपादन समन्वय कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याचेही समोर आले आहे.

Beed Crime: बनावट आदेशांचा संशय

राष्ट्रीय महामार्ग अधिनियमानुसार संपादित जमिनींसाठी वाढीव मोबदला मिळवण्यासाठी खातेदार जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करतात. मात्र बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची 22 एप्रिल 2025 रोजी बदली झाल्यानंतरही त्यांच्या कार्यकाळातील मागील तारखा वापरून बनावट आदेश काढण्यात आल्याचा आरोप आहे. तपासात असेही समोर आले आहे की, जुन्या तारखा आणि कथित बनावट सह्यांच्या आधारे 154 प्रकरणांमध्ये वाढीव मोबदल्याचे आदेश काढण्यात आले. त्यामुळे या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा 

Rupali Chakankar Guwahati Tour With Ashok Kharat: अशोक खरातसोबत गुवाहाटीत, फोटो समोर येताच रुपाली चाकणकर म्हणाल्या, गुरुसोबत दर्शन करता आलं तर....

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baramati Crime News: 'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा
'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा
Pune Crime News: शाळेपासूनचं प्रेम, पण मुलीचा जीव दुसऱ्यावरच जडला; संतापलेल्या एक्स बॉयफ्रेंडने हॉस्टेलमध्ये घुसून तरुणाचा काढला काटा, पुण्यातील शॉकिंग घटना
शाळेपासूनचं प्रेम, पण मुलीचा जीव दुसऱ्यावरच जडला; संतापलेल्या एक्स बॉयफ्रेंडने हॉस्टेलमध्ये घुसून तरुणाचा काढला काटा, पुण्यातील शॉकिंग घटना
Ramesh Mhatre: डॉक्टरांना मारहाण प्रकरण! नगरसेवक रमेश म्हात्रेला अखेर उच्च न्यायालयाचा दिलासा; कठोर अटी अन् शर्तीसह चारही आरोपींना जामीन मंजूर, कोर्टात नेमकं काय घडलं?
डॉक्टरांना मारहाण प्रकरण! नगरसेवक रमेश म्हात्रेला अखेर उच्च न्यायालयाचा दिलासा; कठोर अटी अन् शर्तीसह चारही आरोपींना जामीन मंजूर, कोर्टात नेमकं काय घडलं?
Influencer Attacked: LIVE स्ट्रिमिंग करताना प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर गोळीबार, वर्दळीच्या ठिकाणी झाला हल्ला; मोटारसायकलवरुन हल्लेखोर पळाले
LIVE स्ट्रिमिंग करताना प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर गोळीबार, वर्दळीच्या ठिकाणी झाला हल्ला; मोटारसायकलवरुन हल्लेखोर पळाले
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Embed widget