मनोज जरांगेंच्या विरोधात बोलतो म्हणून मला मारहाण; अमोल खुणे मारहाप्रकरणी 6 अज्ञातांवर गुन्हा; आरोप फरार, पोलीस पथके रवाना
आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे दोन पथके रवाना करण्यात आले आहेत.

Beed crime: मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे जुने सहकारी अमोल खुणे (Amol khune) यांच्यावर ' जरांगेंच्या विरोधात का बोलतोस?' म्हणत बीड तालुक्यातील पाली गावानजीक तरुणांकडून हल्ला करण्यात रविवारी 50 ते 100 तरुणांनी हल्ला केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ उडाली. दरम्यान, बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात 6 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे दोन पथके रवाना करण्यात आले आहेत. संशयीतांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली. (Beed Crime)
बीड जिल्ह्यातील पाली येथील नागनाथ मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या अमोल खुणे यांच्यावर हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, सहा अज्ञात व्यक्तींनी अमोल खुणे यांना मारहाण केली. या घटनेत ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
'मनोज जरांगेंनीच माझ्या हल्ल्याची सुपारी घेतली' अमोल खुणेंचा आरोप
या घटनेनंतर अमोल खुणे यांनी, मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनीच माझ्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी दिली होती, असा आरोप अमोल खुणे यांनी केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी आता पोलीस करतील. नारायणगडावर दसरा मेळावा होत असून या मेळाव्याला मी येणार असल्याचे जाहीर केले होते. मी त्या ठिकाणी येऊ नये म्हणून हा हल्ला माझ्यावर करण्यात आल्याचा आरोप देखील खुणे यांनी केला होता.
याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमोल खुणे यांच्यावर सहा अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या हल्ल्यात अमोल खुणे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमोल खुणे यांच्या तक्रारीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात सहा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली असून संशयितांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली. त्यांनी प्रतिक्रिया देण्यास मात्र नकार दिला.
नेमकी घटना घडली कधी?
मनोज जरांगे पाटील यांच्या जुने सहकारी अमोल खुणे हे बीड तालुक्यातील पाली येथे रविवारी (11 ऑक्टोबर 2026) रोजी दुपारी नागनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्याचवेळी तुळजापूर येथून ज्योत घेऊन येणारे काही तरुण त्या ठिकाणी आले व त्यांनी या मंदिराचे गेट बंद करत अमोल खुणे यांना लाकडे दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणी मध्ये अमोल खुणे यांच्या दोन्ही हातांना गंभीर मार लागला असून त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.





















