एक्स्प्लोर

Beed Bribe News: आधी 50 नंतर 25..., चिठ्ठीवर लिहून दिले आकडे, तीन वेळा धाड फसली पण परळीच्या तहसीलदाराला एसीबीचा मोठा दणका; नांदेडच्या घरातही सापडलं मोठं घबाड

Beed Bribe News: परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली असून लाच मागितल्याच्या प्रकरणात त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Beed Bribe News: बीड (Beed) जिल्ह्यातील परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे (Parli Tehsildar Venkatesh Munde) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली असून लाच (Bribe) मागितल्याच्या प्रकरणात त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईनंतर परळी तहसील कार्यालय परिसरात मोठी खळबळ उडाली असून काही नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर फटाके फोडून प्रतिक्रिया व्यक्त केली.

Beed Bribe News: चिठ्ठीवर लिहून मागितली लाच

मिळालेल्या माहितीनुसार, सॉल्वन्सी प्रमाणपत्र काढून देण्यासाठी तहसीलदार मुंडे यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला 50 हजार रुपयांची मागणी केली होती. पडताळणीदरम्यान त्यांनी चिठ्ठीवर “50” आणि नंतर “25” असे आकडे लिहून लाचेची मागणी केल्याचे तपासात समोर आले. तक्रारदाराने 20 हजार रुपये देण्याची तयारी दर्शवल्यानंतरही “आणखी तीन टाका” असे सांगत 23 हजार रुपये देण्यास सांगितल्याची माहिती आहे.

Beed Bribe News: तीन वेळा सापळा; संशय आल्याने लाच स्वीकारली नाही

या प्रकरणी तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर विभागाने तीन वेळा सापळा रचला. मात्र कारवाईची चाहूल लागल्याने मुंडे यांनी प्रत्यक्ष लाच स्वीकारली नाही. तरीदेखील लाच मागितल्याचे पुरावे स्पष्ट झाल्याने शुक्रवारी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Beed Bribe News: नांदेड येथील घरातून सोने-रोख जप्त

कारवाईनंतर एसीबीच्या पथकाने मुंडे यांच्या नांदेड येथील यशोविहार परिसरातील घराची झाडाझडती घेतली. या तपासात 13 तोळे सोने आणि सुमारे 55 हजार रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यापूर्वीच त्यांच्या जवळील सुमारे 80 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईलही जप्त करण्यात आले होते.

Beed Bribe News: नागरिकांकडून संताप; तहसीलसमोर फोडले फटाके

या कारवाईनंतर परळीमध्ये नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसली. काही नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर फटाके फोडत प्रतिक्रिया दिली. कन्हेरवाडी येथील शेतकरी हनुमंत फड यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून शेताच्या रस्त्यासाठी प्रयत्न करूनही काम झाले नाही. अनेक ठिकाणी पुढाऱ्यांच्या सांगण्यावरूनच कामे होत असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा प्रकारचा मनमानी कारभार थांबला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

Beed Bribe News: प्रशासनात खळबळ

तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यावर एसीबीची कारवाई झाल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई व्हावी आणि सर्वसामान्यांची कामे पारदर्शक पद्धतीने व्हावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.

आणखी वाचा 

Beed Crime News: व्याजाने दिलेले पैसे परत कर म्हणत अपमानास्पद वागणूक, सावकारीच्या जाचाला कंटाळून 22 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल, बीडमधील धक्कादायक घटना

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना
धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget