Baramati Crime Latest News : बारामतीतून विविध ठिकाणाहून गाड्या चोरणारी टोळी बारामती तालुका पोलिसांनी जेरबंद केली आहे. बारामतीतील मॉल, हॉस्पिटल, कॉलेज, व अन्यमुख्य चौकातून तसेच वर्दळीच्या ठिकाणाहून ही टोळी मोटारसायकल चोरत होती. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. तसेच आरोपीकडून 27 गाड्या हस्तगत केल्या आहेत. मागील काही महिन्यापासून बारामती तालुका पोलीस ठाणे हददीतील सुभद्रा मॉल, महिला हॉस्पीटल, व्ही.पी कॉलेज, पेन्सिल चौक परिसरातून मोटार सायकल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पथके तयार केली होती.  


मोटार सायकल चोरी करणारे आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी बारामती शहर परिसरातील अनेक सीसीटिव्ही कॅमे-याचे फुटेज तपासून तांत्रिक माहिती वरून पोलिसांनी आरोपींचा माघ काढला. विजय अशोक माने, प्रदिप रघूनाथ साठे, प्रेम सुभाष इटकर, संतोष तुकाराम गाडे अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत.. आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांनी आरोपीकडे अधिक चौकशी याआरोपीकडून आतापर्यंत स्कुटी, पल्सर, स्पेलंडर अशा वेगवेगळ्या कंपनीच्या मिळून 13 लाख 50 हजार रूपये किंमतीच्या 27 दुचाकी मोटार सायकली हस्तगत केल्या आहेत. 


दुचाकी ठेवल्या पुरून - 
आरोपींनी चोरी केलेल्या काही मोटार सायकली पैकी काही मोटार सायकल या पुरून ठेवल्या होत्या. सदर प्रकरणात अटक केलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापुर्वी दरोडयाचा प्रयत्न, चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीनी पुणे आणि नगर जिल्ह्यात या गाड्यांची चोरी केली होती. 


आरोपींवर 14 गुन्हे -
 सदर आरोपींवर एकूण 14 गुन्हे असल्याचे निष्पन्न झाले आहे. सर्व गुन्हे भादवि कलम 379 मोटरसायकल चोरीचे असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आरोपींकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याच्या शक्यता आहे. तसेच या गुन्हेगारांकडे आणखीन मोटरसायकली मिळण्याची शक्यता आहे.. त्याबाबत बारामती तालुका पोलीस स्टेशन आणखी तपास करीत आहे. सदरची कारवाई पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहा. पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पो.हवा. राम कानगुडे, पो.नाईक अमोल नरूटे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय मदने, शशिकांत दळवी, दिपक दराडे यांनी केलेली आहे. 


महत्वाच्या बातम्या :


CBI Raids: सिसोदिया यांच्या घरी 9 तासांपासून सीबीआयचा तपास सुरु, AAP चा भाजपवर आरोप, भाजपचं प्रत्युत्तर, महत्वाचे 10 मुद्दे
Arvind Kejriwal : दिल्लीच्या शिक्षण मॉडेलची जगभर असलेली चर्चा थांबवण्यासाठी सिसोदिया यांच्या घरावर छापे : अरविंद केजरीवाल