एक्स्प्लोर

Baba Siddique : बाबा सिद्दीकी हत्येचा कट 3 महिन्यांपूर्वीच रचला, युट्यूबवर व्हिडीओ पाहून शूटिंग शिकले; पोलिस तपासातून मोठी माहिती उघड

Baba Siddique Murder Case : अटक करण्यात आलेल्या चौथ्या आरोपीच्या माध्यमातून शूटर्सना दोन मोबाईल आणि पैसे पुरवण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली. 

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट तीन महिन्यांपूर्वीच रचला होता, आरोपी बाबा सिद्दीकी यांच्या घराजवळ अनेकवेळा शस्त्राशिवाय गेले होते अशी माहिती पोलिस तपासामध्ये उघड झाली आहे. मुंबई क्राईम ब्रँचकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे संपूर्ण नियोजन पुण्यात करण्यात आले होते. या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचने आतापर्यंत 15 हून अधिक लोकांचे जबाब नोंदवले आहेत. त्यामध्ये घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या अनेक प्रत्यक्षदर्शींचा समावेश आहे.

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला चौथा आरोपी हरीश हा मध्यस्थ म्हणून काम करत होता. अटक करण्यात आलेला आरोपी प्रवीण आणि शुभम लोणकर (फरार आरोपी) यांनी अटक केलेल्या शूटर गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप यांना दोन लाख रुपये दिले होते. ही रक्कम त्यांनी हरीशच्या मार्फत पाठवली होती.

शूटर्सना दोन मोबाईल आणि पैसे दिले

हरीश गेल्या नऊ वर्षांपासून पुण्यात राहत असून त्याने शूटर्सना पैशांसोबतच दोन मोबाईलही दिले होते अशी माहिती समोर आली आहे. आरोपींनी चॅटिंगसाठी स्नॅप चॅट ॲपचा वापर केला आणि कॉलिंगसाठी इन्स्टाग्रामचा वापर केल्याचेही तपासात समोर आले आहे.

आरोपी शूटर गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप यांनी यूट्यूबवर व्हिडीओ पाहून शूटिंग शिकले. कुर्ला आणि पुण्यात त्यांनी गोळीबाराचा सराव केल्याचं उघड झालं आहे. 

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने आतापर्यंत 4 आरोपींना अटक केली असून तीन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी सापडलेल्या काळ्या पिशवीत 7.62 एमएमची बंदूक सापडल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.

शस्त्र असलेली बॅग सापडली

बाबा सिद्दीकी यांच्यावर ज्या ठिकाणी गोळी झाडण्यात आली, त्याठिकाणाहून जवळपास 100 मीटरच्या अंतरावर एक बॅग सापडली होती. आरोपींनी काही अंतरावर एक बॅग फेकल्याची माहिती पोलिसांकडे होती. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली आणि पोलिसांना एक बॅग सापडली. ज्यामध्ये पोलिसांना आणखी एक शस्त्र सापडले. पोलिसांची ही संपूर्ण कारवाई 'एबीपी माझा'च्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Ashram School : मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget