एक्स्प्लोर

Ashok Kharat: अशोक खरातचं 'पुणे कनेक्शन' उघड, आर्थिक व्यवहारांचा मास्टरमाईंड 'सीए' पोलिसांच्या रडारवर?

Ashok Kharat: पुण्यातील स्वारगेट परिसरात या चार्टर्ड अकाउंटंटचे कार्यालय आहे. संबंधित सीए गेल्या पाच वर्षांपासून अशोक खरातसोबत अत्यंत जवळून काम करत होता.

पुणे: नाशिकच्या अशोक खरात (Ashok Kharat) उर्फ 'कॅप्टन' खरातच्या अश्लील कृत्यांच्या मागे दडलेले आर्थिक व्यवहारांचे मोठे जाळे आता हळूहळू उलगडू लागले आहे. खरातचे सर्व आर्थिक व्यवहार आणि जमिनींच्या खरेदी-विक्रीचे गणित सांभाळणाऱ्या एका चार्टर्ड अकाउंटंटचे (CA) कार्यालय पुण्यात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.(Ashok Kharat)

स्वारगेट परिसरातून हलत होती सूत्रे

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील स्वारगेट परिसरात या चार्टर्ड अकाउंटंटचे कार्यालय आहे. संबंधित सीए गेल्या पाच वर्षांपासून अशोक खरातसोबत अत्यंत जवळून काम करत होता. खरातने स्थापन केलेल्या 'ईशान्येश्वर मंदिर ट्रस्ट'वरही या सीएने पाच वर्षे विश्वस्त म्हणून काम पाहिले आहे. सध्या तो या ट्रस्टवर नसला, तरी खरातच्या साम्राज्यातील प्रत्येक पैशाचा हिशोब या सीएच्या माध्यमातूनच पूर्ण व्हायचा.(Ashok Kharat)

पाच वर्षांच्या व्यवहारांची 'कुंडली' सीएकडे?

अशोक खरातने केवळ आध्यात्मिक क्षेत्रातच नव्हे, तर रिअल इस्टेटमध्येही मोठी गुंतवणूक केली आहे. गेल्या पाच वर्षांत खरातने कुठे-कुठे जमिनींचे व्यवहार केले? त्या व्यवहारांसाठी पैसा कोणाकडून आला? आणि गुंतवणुकीच्या नावाखाली किती लोकांची आर्थिक फसवणूक केली? या सर्व प्रश्नांची उत्तरे या पुणेकर सीएकडे असण्याची दाट शक्यता आहे. खरातच्या नावावर असलेल्या आणि बेनामी मालमत्तेची सर्व माहिती या सीएकडे दडलेली असल्याचे बोलले जात आहे.

एसआयटी (SIT) चौकशी करणार का?

खरात प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले विशेष तपास पथक (SIT) आणि नाशिक पोलीस आता या चार्टर्ड अकाउंटंटची चौकशी करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खरातच्या अश्लील व्हिडिओंच्या आधारे जे आर्थिक ब्लॅकमेलिंग झाल्याचे आरोप होत आहेत, त्या पैशांचा विनियोग कसा झाला, याचा छडा लावण्यासाठी या सीएची उलटतपासणी होणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

अशोक खरात दहावी परीक्षेत गणितात नापास 

अशोक खरातच्या शैक्षणिक वास्तव समोर आलं आहे.  दहावी परीक्षेत गणितात नापास झाल्याची माहिती समोर आले आहे. गुणपत्रिकेनुसार एकूण २५१ गुण, टक्केवारी सुमारे ३५.८८% तर मराठीमध्ये 39 इंग्रजीत 37 गणितात 28 विज्ञानात 62 समाजशास्त्राचा 38 आणि हिंदीमध्ये 47 गुण मिळाले होते. नाव बदलून ‘अशोककुमार’ तर कॅप्टन उपाधी लावून जहाजावर अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. खरातचे खरे नाव लक्ष्मण असल्याचं समोर आलं आहे.सिन्नर तालुक्यातील कहांडळावडीमध्ये खरात वावी येथील माध्यमिक शाळेचा विद्यार्थी आहे. अंकशास्त्र शिकवणारा व्यक्ती स्वतःच गणितात अपयशी झाल्याचे दिसून आले आहे.(Ashok Kharat) 

शाळेत 'लक्ष्मण' असलेले मूळ नाव नंतर झालं 'अशोककुमार'

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात याचे मूळ गाव सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी (शिवाजीनगर) आहे. तो शिक्षणासाठी तेथून चार किलोमीटरवर असलेल्या वावी येथील माध्यमिक शाळेत जात होता. १ जून १९६५ ची जन्मतारीख असलेल्या अशोक खरात याचे शाळेत नाव 'लक्ष्मण एकनाथ खरात' असे होते. या लक्ष्मण नावाने त्याने मार्च १९८३ मध्ये दहावीच्या बोर्डाची परीक्षा बैठक क्र. सी-५२३४१ या आसन क्रमांकाने दिली. त्यात खरात दोन विषयांत नापास झाल्याचे दिसून येते. खरात याला मराठी विषयात ३९, इंग्रजी ३७, गणित २८, विज्ञान ६२, समाजशास्त्र ३८, हिंदी ४७, असे एकूण २५१ गुण मिळाले होते. तर टक्केवारी जेमतेम ३५.८६ होती.(Ashok Kharat) 

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचं रॅगिंग, कंटाळून होस्टेल सोडलं, 14 दिवसांपासून संपर्कच नाही!
पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचं रॅगिंग, कंटाळून होस्टेल सोडलं, 14 दिवसांपासून संपर्कच नाही!
Thane Crime News: 25 हजार पाऊंड देण्याचं आमिष दाखवलं, 'दिल्ली विमानतळावर अडकलो' म्हणत उकळले 2 लाख; महिला डॉक्टरसोबत नेमकं काय घडलं?
25 हजार पाऊंड देण्याचं आमिष दाखवलं, 'दिल्ली विमानतळावर अडकलो' म्हणत उकळले 2 लाख; महिला डॉक्टरसोबत नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Embed widget