एक्स्प्लोर

Ashok Kharat Nashik Crime News: अशोक खरातचा लुटीचा 'रिंग' मास्टर प्लॅन उघड, पाच हजारांची अंगठी लाखांना विकली; SIT कडून 'त्या' ऑफीसमधून अंगठीची मापे आणि धनादेश जप्त

Ashok Kharat Nashik Crime News: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात विशेष तपास पथकाच्या हाती आता मोठे पुरावे लागले आहेत.

Ashok Kharat Nashik Crime News: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती आता मोठे पुरावे लागले आहेत. खरातच्या सातव्या गुन्ह्याचा तपास करत असताना 'एसआयटी'ने त्याच्या 'ओकस' कार्यालयाची झडती घेतली. यावेळी भाविकांची आर्थिक लूट करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि एक कोरा धनादेश जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे खरातचे काळे कारनामे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

Ashok Kharat Nashik Crime News: 5 हजारांची अंगठी लाखांना विकायचा!

एसआयटीच्या तपास पथकाला खरातच्या कार्यालयात स्टीलच्या कडीमध्ये अडकवलेली अंगठी बनवण्याची एकूण 35 गोलाकार मापे सापडली आहेत. तपासात असे समोर आले आहे की, भोंदू खरात आपल्या जाळ्यात अडकलेल्या भक्तांच्या आणि पीडित महिलांच्या बोटांचे माप घेऊन त्यांना विशिष्ट 'अंगठी' घालण्याचा सल्ला द्यायचा. बाजारात साधारण 5 हजार रुपयांना मिळणारी अंगठी तो भाविकांना चक्क लाखो रुपयांना विकत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: धनादेश आणि आर्थिक लुटीचे पुरावे

तपास पथकाने कार्यालयातून एका महिलेच्या नावाचा मोठ्या रकमेचा धनादेश (Cheque) देखील जप्त केला आहे. पूजेच्या विधीसाठी आणि समस्या निवारणासाठी खरात हा भक्तांकडून मोठी रक्कम उकळत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. यापूर्वी खरातवर महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे गंभीर आरोप आहेतच, मात्र आता या पुराव्यांमुळे त्याने भक्तांची आर्थिक लूट कशा प्रकारे केली, याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

Ashok Kharat Nashik Crime News: पूजा विधीच्या नावाखाली शोषण

धार्मिक विधी आणि दैवी शक्तीचा धाक दाखवून अशोक खरात महिलांचे लैंगिक शोषण करत होता. पीडित महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी तो या अंगठ्यांचा आणि पूजेचा वापर करत असे. एसआयटीने जप्त केलेले हे पुरावे न्यायालयात खरात विरोधात भक्कम आधार ठरणार आहेत. नाशिक पोलिसांनी या प्रकरणात कडक पावले उचलली असून, आणखी कुणाची लूट झाली असल्यास त्यांनी समोर येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Ashok Kharat Nashik Crime: अशोक खरात फार्म हाऊसवर मुलींसोबत दारु प्यायचा, नशेत बेडवर लघवी... सीएने पाठवलेल्या हेराकडून काळ्या कारनाम्यांचं घबाड समोर आलं

Ashok Kharat Nashik Court Hearing: मोठी बातमी: अशोक खरातच्या जीवाला धोका? सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांचा खळबळजनक दावा; कोर्टात नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! शाळेत अनधिकृत प्रवेश, अभिजीत दिपकेंसह 6 जणांवर गुन्हा; सीजेपीला स्कुल चलो अभियान भोवलं
मोठी बातमी! शाळेत अनधिकृत प्रवेश, अभिजीत दिपकेंसह 6 जणांवर गुन्हा; सीजेपीला स्कुल चलो अभियान भोवलं
संतापजनक! बापाकडूनच पोटच्या लेकीवर अत्याचार, रायगड जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना, गुन्हा दाखल 
संतापजनक! बापाकडूनच पोटच्या लेकीवर अत्याचार, रायगड जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना, गुन्हा दाखल 
भाड्याने वाहन लावून देण्याचं आश्वासन, महिलेकडून तब्बल 33 लाखांची फसवणूक, दिंडोशी पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीला मध्य प्रदेशातून अटक 
भाड्याने वाहन लावून देण्याचं आश्वासन, महिलेकडून तब्बल 33 लाखांची फसवणूक, दिंडोशी पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीला मध्य प्रदेशातून अटक 
Sindhudurg News: दहावीच्या विद्यार्थिनीने तलावात उडी मारली; तरूण वाचवायला गेला पण...; दोघांचाही दुर्दैवी अंत, सिंधुदुर्गमधील घटना
दहावीच्या विद्यार्थिनीने तलावात उडी मारली; तरूण वाचवायला गेला पण...; दोघांचाही दुर्दैवी अंत, सिंधुदुर्गमधील घटना

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
Embed widget