एक्स्प्लोर

Ashok Kharat : खरातचे पाप, गुन्हे अमाप! अशोक खरातविरोधात तक्रारींची संख्या वाढली, आणखी 11 महिला भोंदूच्या विरोधात उभ्या

Ashok Kharat Crime Case : भोंदू मांत्रिक अशोक खरात प्रकरणात तक्रारींचा आकडा आता 22 वर पोहोचला आहे. या आधी त्याच्यावर 12 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नाशिक : भोंदू मांत्रिक... वासनांध सैतान... धूर्त दलाल... या सगळ्याला समानार्थी शब्द म्हणजे नाशिकच्या पोलीस कोठडीची हवा खाणारा अशोक खरात. अशोक खरातवर दाखल 12 गुन्ह्यांचा वेगवेगळ्या यंत्रणांकडून तपास सुरू आहे. मात्र गुन्ह्यांचा हा आकडा लवकरच वाढणार आहे. कारण आणखी 11 महिला पुढे आल्या असून त्यांनी अशोक खरातविरोधात तक्रार दाखल केली आहे. या महिलांना खरातनं आपल्या जाळ्यात कसं ओढलं? यासंबंधी काही माहिती समोर आली आहे.

भोंदू मांत्रिक अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून तक्रारींचा आकडा आता 22 वर पोहोचला आहे. आधीच अनेक गुन्ह्यांमध्ये अटक झालेल्या खरातविरोधात आणखी 11 महिलांनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे. या घडामोडींमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.

Ashok Kharat SIT Helpline Update : हेल्पलाईनवर तक्रारींचा ओघ कायम

अशोक खरातच्या दुष्कृत्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर महिलांना पुढे येण्यासाठी एसआयटीकडून हेल्पलाईन सुरू करण्यात आली होती. त्यानंतर तक्रारींचा ओघ थांबण्याचे नाव घेत नाही. आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी 8 प्रकरणे लैंगिक शोषणाशी संबंधित आहेत, तर 4 गुन्हे आर्थिक फसवणुकीचे आहेत. आता नव्याने 11 महिलांनी तक्रार दिल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.

Ashok Kharat Exploitation Case : ‘ऊर्जादान’च्या नावाखाली शोषणाचे आरोप

तक्रारदार महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरात ऊर्जादान आणि शरीरशांतीच्या बहाण्याने महिलांना जाळ्यात ओढत असे. त्यानंतर त्यांचे लैंगिक शोषण केले जात असल्याचा आरोप आहे. काही महिलांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचेही समोर आले आहे.

Ashok Kharat Investigation Update : विविध यंत्रणांकडून चौकशी सुरू

या प्रकरणाचा तपास सध्या विविध पातळ्यांवर सुरू आहे. महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी एसआयटी तपास करत आहे, तर आर्थिक गैरव्यवहाराच्या अनुषंगाने ईडी चौकशी करत आहे. समता पतसंस्थेतील व्यवहारांबाबत शिर्डी पोलीस स्वतंत्र तपास करत आहेत.

दरम्यान, अशोक खरातची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. एका प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी दुसऱ्या प्रकरणात पुन्हा पोलीस कोठडीसाठी त्याला न्यायालयात सादर केले जाणार आहे.

Ashok Kharat Case Political Reaction : तपासावरून राजकीय प्रश्नचिन्ह

या प्रकरणावरून राजकीय वर्तुळातही प्रश्न उपस्थित होत आहेत. विरोधकांनी तपासाची गती आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रत्येक आरोपीची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी केली जात आहे.

Ashok Kharat Case Social Impact : अंधश्रद्धा आणि महिलांची सुरक्षितता पुन्हा चर्चेत

या घटनेमुळे समाजातील अंधश्रद्धा आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका बाजूला महिला सर्व क्षेत्रांत प्रगती करत असताना, दुसऱ्या बाजूला अशा भोंदूगिरीमुळे त्यांचे शोषण होत असल्याचे वास्तव चिंताजनक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Delhi CISF Jawan News: CISF जवान मेट्रोत चढला, लपून फोटो काढत बसला; महिलेने बघताच राडा; मोबाईलच्या गॅलरीमध्ये सगळं दिसलं, पुढे काय घडलं?
CISF जवान मेट्रोत चढला, लपून फोटो काढत बसला; महिलेने बघताच राडा; मोबाईलच्या गॅलरीमध्ये सगळं दिसलं, पुढे काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Bollywood Actor Prem Adib Life Stroy: ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', लोक देवघरात फोटो लावून पुजायचे, ओळखलं का कोण?
ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', ओळखलं का कोण?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
Bhavesh Kaware and Amit Thackeray: भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Embed widget