एक्स्प्लोर

Ashok Kharat Case Nashik Crime News: गुंगीचं औषध, वेदनाशामक गोळ्या...अशोक खरातने केबिनमध्ये महिलांना काय काय दिलं?, डॉक्टरांनी चौकशीत सगळं सांगून टाकलं!

Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरात प्रकरणात एसआयटीकडून तीन ते चार डॉक्टरांची चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

Ashok Kharat Case Nashik Crime News: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याला आज (2 एप्रिल) पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. पहिल्या गुन्ह्यातील पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर अशोक खरातला काल (1 एप्रिल) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सध्या अशोक खरातची सध्या एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. याचदरम्यान, चौकशीतून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

अशोक खरात प्रकरणात एसआयटीकडून तीन ते चार डॉक्टरांची चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. नाशिकमधल्या बड्या डॉक्टरची चौकशी झाल्याची माहिती समोर आली आहे. महिलांना गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या डॉक्टरांची एसआयटीकडून चौकशी झाली. यावेळी अशोक खरातने याच डॉक्टरांकडून सल्ला घेऊन ओशनो जलच्या नावाखाली गुंगी येणाऱ्या औषधे, वेदनाशामक गोळ्या महिलांना दिल्याची माहिती समोर आली आहे. अशोक खरातने एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याने गर्भवती राहिलेल्या महिलेला ओकस कार्यालयामध्ये अशोक खरातने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या होत्या. अशोक खरातला आज कोर्टात दाखल केल्यानंतर काही महत्त्वाचे पुरावे एसआयटी अधिकाऱ्यांकडून न्यायालयासमोर सादर केले जाणार आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

अशोक खरातने महिलेला दिलेल्या गर्भपाताच्या गोळ्या- (Ashok Kharat Case Nashik Crime News)

पूजाविधीच्या बहाण्याने  तसेच लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटित महिलेवर अत्याचार करून तिचा गर्भपात केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहस्थळ आले, त्याच्याशी सुखी संसार होईल का? अशी विचारणा करण्यासाठी पीडित महिला आई-वडिलांसोबत पहिल्यांदा 2013 मध्ये अशोक खरातकडे गेले होते. त्याने सुखाचा संसार होईल असे सांगत इशानेश्वर मंदिरात जाऊन पूजा करण्यासाठी सांगितले. महिलेला दोन आपत्य झाले. मात्र काही दिवसांनी घरगुती भांडणे टोकाला गेल्याने पतिपत्नी विभक्त झाले. त्यानंतर पुन्हा पीडित महिला आई-वडिलांसोबत खरातकडे भविष्यबाबत मार्गदर्शन ऐकण्यासाठी गेले. तेव्हापासून नराधमाने महिलेवर वाईट नजर टाकायला सुरुवात केली. पुढच्या वेळी महिला अशोक खरातकडे गेली असता त्याने लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर महिला स्पर्धा परीक्षाच्या तयारीसाठी दिल्लीला गेली. मात्र मुलांच्या भविष्याच्या काळजीमुळे पुन्हा नाशिकला परतली. पुन्हा  खरातचे मार्गदर्शन घेण्यासाठी गेली असता त्याने तिला आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरवात केली. तांब्याच्या भांड्यातील पाणी पाजून अत्याचार केले. तुझा घटस्फोट लिखित होता. तू मागिल जन्माची अप्सरा आहे. मी अवतारी पुरूष आहे. माझे दोन विवाह होणार आहेत, दुसरा विवाह तुझ्याशी होणार असे सांगून पीडितेवर अत्याचार केले. महिला प्रेग्नंट राहिल्याने अशोक खरातने गर्भपातच्या गोळ्या खाऊ घालून महिलेचा गर्भपात केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अशोक खरातने चार वर्षांत 70 कोटींची खरेदी केली प्रॉपर्टी- (Ashok Kharat Property)

अशोक खरातच्या कॅशनेच व्यवहार करत असल्याचे पुन्हा उघडकीस आले आहे. अशोक खरातने रोख व्यवहारातून आर्थिक साम्राज्य उभं केलं. 3 दिवसांत अशोक खरातच्या  बँक खात्यांची तीनवेळा एसआयटीने तपासणी केल्याची माहिती समोर आली आहे. कोणताही अधिकृत हिशोब नसल्याची शक्यता आहे.  व्यवहारांची साखळी उलगडण्यास सुरुवात झाली असून मोबाईलमधून डेटा जप्त, महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. अशोक खरातने चार वर्षांत सुमारे 70 कोटींची प्रॉपर्टी खरेदी केली आहे. नाशिक, पुणे, अहिल्यानगरमध्ये अशोक खरातने मोठी गुंतवणूक केली आहे. अनेक व्यवहारांमध्ये पार्टनर म्हणून इतरांची नावे आहेत. अशोक खरातने रोखीनेच बहुतांश पेमेंट केल्याचे उघड झाले आहे. नाशिकमधील बंगला आणि ऑफिसचे काम केलेल्या कामगारांना सुमारे 25 लाख रोख दिल्याचे तपासात उघड झाले आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

संबंधित बातमी:

Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिले लग्न, दोन आपत्य, मग घटस्फोट; अशोक खरातने महिलेला ते वाक्य बोलून जाळ्यात ओढलं, पुढे गर्भपातसह हादरवणारं घडलं!

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Crime : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून संपवलं; नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, दीड वर्षात सुनावणी पूर्ण
चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून संपवलं; नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, दीड वर्षात सुनावणी पूर्ण
Beed Crime: उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला, अन् तब्ब्ल 45 लाखांची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात अडकला; नांदेडच्या MPSC टॉपर अन् क्लास 1 अधिकाऱ्याला अटक
उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला अन् तब्ब्ल 45 लाखांची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात अडकला; नांदेडच्या MPSC टॉपर अन् क्लास 1 अधिकाऱ्याला अटक
Vasai Crime : कोट्यवधी रूपये लाटण्याचा टाकला मोठा डाव, कंपनीच्या अध्यक्षानेच एमडींचा काटा काढण्याचा प्लॅन रचला अन्..., वसईतील धक्कादायक घटना
कोट्यवधी रूपये लाटण्याचा टाकला मोठा डाव, कंपनीच्या अध्यक्षानेच एमडींचा काटा काढण्याचा प्लॅन रचला अन्..., वसईतील धक्कादायक घटना
Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget