एक्स्प्लोर

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातची 10 तास चौकशी, SIT तपासातून धक्कादायक माहिती समोर

Ashok Kharat SIT Investigation : नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात विरोधात आणखी तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याच्यावरील गुन्ह्यांची संख्या आता सहा इतकी झाली आहे.

नाशिक : शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरातची (Ashok Kharat) एसआयटीकडून (SIT) सोमवारी तब्बल दहा तास चौकशी करण्यात आली. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते (Tejaswi Satpute) यांनी अशोक खरातची स्वतः चौकशी केली. यावेळी त्यांनी खरातकडून इतर गुन्ह्यांचेही जबाब नोंदवून घेतले असल्याची माहिती आहे. 

एसआयटीच्या एका टीमने नाशिकमधील कॅनडा कॉनर येथे असलेल्या प्रॉपर्टीची पीडित महिलांसोबत जाऊन खरातची मोडस ऑपरेंडी जाणून घेतली. मंगळवारी अशोक खरातची पोलीस कोठडी संपणार आहे. त्यामुळे अशोक खरातला मंगळवारी दुपारी दोन वाजेपर्यंत नाशिकच्या सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे. 

Ashok Kharat Police Investigation : पोलिसांकडून कसून तपास सुरू

पोलिसांकडून अशोक खरातचं कार्यालय तसंच इतर कागदपत्रं तपासणी करत सबळ पुरावे गोळा करण्यात येत असल्याची माहिती आहे. महिलांना भोंदू अशोक खरात कशा पद्धतीने जाळ्यात अडकवत होता याचा सखोल तपास केला जात आहे.

भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची क्राईम ब्रांचने तपासणी केली. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परसरातील ओकस कार्यालयाची क्राईम ब्रांचने तपासणी केली असून याच कार्यालयात महिलांचं शोषण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.  पोलिसांनी पीडित महिलांना सोबत घेऊन कार्यालयाची तपासणी केली. तसंच या कार्यालयातून अनेक जमिनींचे व्यवहारदेखील झाल्याची माहिती मिळाली आहे.

Ashok Kharat Case  : खरातवर आणखी तीन गुन्हे

नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात विरोधात आणखी 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भोंदू खरातवर आतापर्यंत 6 गुन्हे दाखल झाले आहेत. खरातविरोधात लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. नाशिक पोलिसांकडून पीडित महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला असून अत्याचार झालेल्या महिलांनी तक्रारीसाठी पुढे येण्याचं आवाहन एसआयटी प्रमुखांनी केलं. त्यामुळे खरातच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचं दिसून येत आहे. 

Ashok Kharat Crime :नकली नाग दाखवून भक्तांना घाबरवायचा

बुवाबाजी करत खरातनं अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. भोंदू अशोक खरातनं रबराचा नकली नाग आणि वाघाचं कातडं दाखवून अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. खरात नाशिकच्या मीरपूर येथील ईशानेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या घनदाट जंगलात भक्तांना पूजेसाठी बोलावायचा. त्या ठिकाणी भक्तांना घाबरवून आणि अघोरी कृत्ये करुन खरात त्यांच्याकडून पैसे वसूल करायचा.

धक्कादायक म्हणजे साधं चिंचोका हे एखादं रत्न असल्याच्या भूलथापा मारत खरातनं हे कवडीमोल चिंचोके एक लाखांना विकल्याचं समोर आलं. ही सर्व चक्रावून टाकणारी माहिती खरातच्या एका निटकवर्तीयाच्या एफआयआरमधून समोर आली.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget