एक्स्प्लोर

Amravati : तब्बल 180 महिलांचं लैंगिक शोषण, 350 पेक्षा जास्त अश्लील व्हिडीओ? अमरावतीत रॅकेटचा पर्दाफाश

Amravati Women Exploitation Racket : अमरावतीत 19 वर्षीय तरुणावर तब्बल 180 महिलांचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

अमरावती : राज्यभरात खरातच्या कारनाम्यांची चर्चा झडत असताना अमरावतीत आणखी एक सेक्स रॅकेट (Amravati Women Exploitation Racket ) उघडकीस आलं आहे. अवघ्या 19 वर्षाच्या आरोपीनं अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून चौकशीत मोठं प्रकरण बाहेर येण्याची शक्यता आहे. 

सोशल मीडियावर अनेक अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणात आरोपीने अनेक तरुणींना मैत्री आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि नंतर ब्लॅकमेल करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Women Exploitation Racket : 180 महिलांच्या शोषणाचा आरोप

सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीने सुमारे 150 ते 180 महिलांना ब्लॅकमेल करत लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. आतापर्यंत 10 ते 15 महिलांसोबत अश्लील व्हिडीओ तयार केल्याचे उघड झाले आहे. हे व्हिडीओ Instagram आणि Telegram सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले होते.

Police Action : तक्रारीनंतर गुन्हा दाखल

या प्रकरणावरून भाजप नेते अनिल बोंडे आणि प्रवीण तायडे आक्रमक झाले होते. पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप करत त्यांनी तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात विशाल आनंद यांनी पीडित महिलांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

Victims Appeal : महिलांना पुढे येण्याचे आवाहन

पोलिसांनी सांगितले की, पीडित महिलांच्या कुटुंबीयांनी पुढे येऊन तक्रार करावी. साध्या वेशातील महिला पोलिसांना त्यांच्या संपर्कासाठी पाठवले जाणार आहे. अद्याप एकही अधिकृत तक्रार दाखल झाली नसली तरी पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला आहे.

Accused Background : आरोपी विद्यार्थी, टोळीचा संशय

आरोपी हा परतवाड्यातील गटरमलपूरा भागात राहणारा असून अकरावीचा विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आरोपी एकटा नसून त्यामागे मोठे नेटवर्क सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Social Concern : भीतीमुळे तक्रारी पुढे येत नाहीत

समाजात बदनामी होण्याची भीती किंवा गुन्हेगारांकडून धोका असल्यामुळे अनेक पीडित महिला तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकरणांमध्ये पीडितांनी पुढे येऊन तक्रार केल्यासच अशा गुन्हेगारी चक्राला आळा बसू शकतो.

ही बातमी वाचा:

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Parbhani Crime: मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात
मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात
Nashik Ashram School : मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Embed widget