एक्स्प्लोर

Paratwada Crime : तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल

Amravati Viral Video Case : अमरावतीतील अश्लील व्हिडीओ व्हायरल प्रकरणी युवकावर POCSO आणि BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अनेक तरुणींचं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

अमरावती : परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरात अश्लील व्हिडीओ व्हायरल प्रकरणानं मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात 19 वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदार प्रवीण तायडे (Pravin Tayade) यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलीस ठाण्यात POCSO आणि BNS 294 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस यंत्रणेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Amravati Viral Video Case : सोशल मीडियावर अश्लील व्हिडीओ व्हायरल

परतवाडा शहरातील गटरमलपुरा परिसरातील एका युवकाने इंस्टाग्राम आणि टेलिग्रामवर तरुणी आणि महिलांचे अश्लील व्हिडीओ प्रसारित केल्याचा आरोप आहे. या व्हिडीओमध्ये संबंधित युवक महिलांसोबत अश्लील कृत्य करताना दिसत असल्याचा दावा केला जातोय. या व्हिडीओमुळे परतवाडा आणि अचलपूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Sexual Exploitation Allegation : प्रेमाच्या जाळ्यात अडकवून शोषण?

या प्रकरणात आरोपीने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत संबंध प्रस्थापित केले आणि त्याचं चित्रीकरण करून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय.  भाजपचे नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी या प्रकरणात धक्कादायक दावा करत सुमारे 180 तरुणींचं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप केला आहे. तसेच 350 हून अधिक व्हिडिओ व्हायरल झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Police Action : उशिरा कारवाई? SIT चौकशीची मागणी

गेल्या काही दिवसांपासून हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना पोलिसांनी तात्काळ कारवाई का केली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात SIT चौकशीची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपी युवकाने कुटुंबासह परतवाडा सोडल्याची माहिती समोर येत असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Paratwada Video Investigation Update : पुढील तपास सुरू

पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून पीडित महिलांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. तसेच व्हायरल व्हिडीओंची सत्यता आणि त्यामागील नेटवर्क उघड करण्यासाठी तांत्रिक तपासही केला जातोय. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे.

ही बातमी वाचा:

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
Embed widget